शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:36 IST2017-08-25T00:49:17+5:302017-08-25T01:36:41+5:30
हिवराखुर्द (बुलडाणा): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून संतोष रंगनाथ शिंदे या तरुण शेतकर्याने विषारी द्रव्य प्राशन करुन २३ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. संतोष यांना तत्काळ नातेवाईकांनी उपचारार्थ जानेफळला एका खासगी रुग्णालयात हलविले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शेतकरी आत्महत्या
ठळक मुद्देविषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या उपचारादरम्यान मृत्यूपीक परिस्थितीमुळे हतबल
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवराखुर्द (बुलडाणा): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून संतोष रंगनाथ शिंदे या तरुण शेतकर्याने विषारी द्रव्य प्राशन करुन २३ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. संतोष यांना तत्काळ नातेवाईकांनी उपचारार्थ जानेफळला एका खासगी रुग्णालयात हलविले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पीक परिस्थितीमुळे हतबल
संतोष शिंदे यांनी कर्ज काढून दुबार पेरणी करावी लागली. त्यांनी सावकारकडून कर्ज काढून दुबार पेरणी केली. परंतु आता पाऊस लांबल्याने करपलेले पीक आणि गळून पडलेली सोयाबीनची फुले पाहून ते व्यथित झाले होते.