शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

१ मार्चपासून शेतकरी पुन्हा संपावर !; शेतकरी सुकाणू समितीच्या मेळाव्यात निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 15:23 IST

सरसकट कर्जमाफी व हमीभाव यासाठी येत्या १ मार्चपासून महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा संपावर जाणार आहेत. शेतकरी सुकाणू समितीच्या आज सुभेदारी गेस्ट हाऊसवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुपारी रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीमंत मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात कालिदास आपेट यांनी हा निर्णय जाहीर केला.

औरंगाबाद : सरसकट कर्जमाफी व हमीभाव यासाठी येत्या १ मार्चपासून महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा संपावर जाणार आहेत. शेतकरी सुकाणू समितीच्या आज सुभेदारी गेस्ट हाऊसवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुपारी रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीमंत मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात कालिदास आपेट यांनी हा निर्णय जाहीर केला. 

शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर येत्या १६ व १७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुकाणू समितीचे शिष्टमंडळ चर्चाकरील. त्यानंतर १ मार्चपासून सुरू होणार्‍या संपाच्या तयारीसाठी सुकाणू समितीचा महाराष्ट्र दौरा सुरू होईल. दुपारी मेळाव्यात सुकाणू समितीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. कालिदास आपेट यांनी प्रास्ताविकात पुढील आंदोलनाची व कृती कार्यक्रमाची दिशा स्पष्ट केली. कॉ. नामदेव गावडे, प्रतिभा शिंदे, किशोर ढमाले, गणेशकाका जगताप, करण गायकर आदींची या मेळाव्यात घणाघाती भाषणे झाली. 

हा नागनाथ व तो सापनाथप्रतिभा शिंदे यांनी आरोप केला की, भाजप- सेनावाले नागनाथ, तर काँग्रेस- राष्ट्रवादीवाले सापनाथ आहेत. हे दोघेही परवडणारे नाहीत. त्यासाठी आता आपल्याला महाराष्ट्रात एक समर्थ पर्याय उभा करायचा आहे. कारण सरकार पेरण्याची ताकद जशी शेतकर्‍यांमध्ये आहे तशीच कापण्याची ताकदही त्याच्यात आहे. सध्याच्या सरकारला शेतकरी- शेतमजुरांबद्दल काहीही प्रेम नाही. त्यांच्याशी सरकारला काहीही देणे-घेणे नाही. 

सदाभाऊ खोत यांच्यावरही प्रतिभा शिंदे यांनी टीकेची झोड उठवली. ‘नाव स्वाभिमानी आणि धंदा बेइमानी’ असे हे सदाभाऊ खोत. ते कधीच शेतकर्‍यांचे नव्हते.  अनिल पालोदे, संजय घाटनेकर, कॉ. भगवान भोजने, सचिन धांडे, बन्सी सातपुते आदींचीही मेळाव्यास उपस्थिती होती. 

खर्‍या अर्थाने तुम्ही नीचचनीच म्हटले असे मानून बाईसारखे रडत व त्याचे भांडवल करीत नरेंद्र मोदी यांनी गुजरातची सत्ता मिळवली; पण खरे सांगायचे तर हे भाजपवाले नीचच आहेत, असा हल्लाबोल छावा वीर क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केला. १ मार्चपासून सुरू होणार्‍या शेतकर्‍यांच्या संपात नाशिक जिल्हा ऐतिहासिक भूमिका पार पाडेल, अशी ग्वाही दिली. ‘कर्ज न घेणार्‍या एका आमदाराची कर्जमाफी झाली. हे स्वत: त्या आमदारानेच सांगितले. वारे डिजिटल इंडिया’अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.

जाब विचारण्यासाठीमराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना भावही कमी मिळतोय. याचा जाब विचारण्यासाठी रघुनाथदादा पाटीलांच्या नेतृत्वाखाली सुकाणू समितीचे सदस्य व उपस्थित शेतकरी क्रांतीचौकातील साखर सहसंचालकांच्या कार्यालयाकडे रवाना झाले.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद