शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:49 PM2017-08-16T23:49:44+5:302017-08-16T23:49:44+5:30

यंदाचीही परिस्थिती बिकट असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे ‘शेतकरी हा कर्ज मुक्त झालाच पाहिजे’ आदी घोषणा करत आ. रामराव वडकुते यांच्या नेतृत्वाखाली १६ आॅगस्ट रोजी शेतकºयांनी सेनगाव तहसीलवर मोर्चा काढला.

Farmers should be free from debt | शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे

शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : यंदाचीही परिस्थिती बिकट असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे ‘शेतकरी हा कर्ज मुक्त झालाच पाहिजे’ आदी घोषणा करत आ. रामराव वडकुते यांच्या नेतृत्वाखाली १६ आॅगस्ट रोजी शेतकºयांनी सेनगाव तहसीलवर मोर्चा काढला.
यंदाही सेनगाव तालुक्यात सरासरीच्या अंत्यत कमी पाऊस झाल्याने पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे सेनगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकºयांना तातडीने नवीन पीक कर्ज वाटप करावे, वन्य प्राण्यांपासून शेतकºयांचे संरक्षण करावे, वनविभागामार्फत केल्या जात असलेल्या कामाची चौकशी करावी. तसेच सेनगाव येथे मंजूर वनपरीक्षेत्र कार्यालय तात्काळ कार्यान्वित करावे, आदी मागण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकºयांचा आ. रामराव वडकुते यांच्या नेतृत्वाखाली आजेगाव कॉनरवरून मोर्चा काढला. मुख्य रस्त्यावरून मोर्चा दुपारी दोन वाजता तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चात शेतकºयांना मार्गदर्शन केले. राज्य व केंद्र शासनाच्या धोरणाबद्दल टिका केली. तहसीलदार वैशाली पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. प्रशासनाने मागण्या संदर्भात सकारात्मक कारवाईच केली नाही तर यापुढेही तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा आ. वडकुते यांनी दिला. मोर्चात आ. वडकुते यांच्यासह किसान विकास मंचचे माजी आ. शंकर अण्णा धोंडगे, रा.कॉ जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, जि.प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, औंढा तालुकाध्यक्ष संजय दराडे, माजी सभापती अप्पासाहेब देशमुख, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख, माजी जि.प. सदस्य विनायकराव देशमुख, रा.का तालुकाध्यक्ष रवींद्र गडदे, जि.प. सदस्य संजय कावरखे, उपनगराध्यक्ष कैलास देशमुख, नगरसेवक उमेश देशमुख, विकास शिंदे, सचिन देशमुख, संदीप बहिरे, निखील देशमुख, दत्तराव टाले, नितीन गोरे, गजानन पाटील, अरुणआप्पा खुळे, शालीक गडदे, प्रवीण महाजन, संतोष तिडके, देविदास, अनंता देशमुख, विनोद आकमार आदी सहभागी होते.

Web Title: Farmers should be free from debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.