शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मराठवाड्यातील शेतकरी सध्या संक्रमणातून जातोय : पी. साईनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 19:15 IST

शेती आणि शेतकऱ्यांबाबत तातडीने निर्णय होत नसल्यामुळे सावकारांचे फावते

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी सध्या संक्रमणातून जात आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी हा विभाग सध्या होरपळतो आहे. दरडोई पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशी व्यवस्था नाही. ४० टक्के ग्रामीण भाग पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. शेती आणि शेतकऱ्यांबाबत तातडीने निर्णय होत नसल्यामुळे सावकारांचे फावत असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी मंगळवारी व्यक्त केले.

येथील बेट्रा संस्थेच्या सभागृहात पी. साईनाथ यांनी ‘नेशन फॉर फार्मस्’च्या अनुषंगाने शहरातील काही डॉक्टर, प्राध्यापक, वकील, चळवळीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एमजीएमचे प्रतापराव बोराडे, एआयबीईएचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर, प्रा.अजित दळवी, प्रा. विजय दिवाण आदींची उपस्थिती होती. 

पी.साईनाथ म्हणाले, २००४ मध्ये कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाने शासनाकडे अहवाल दिला. त्यावर आजवर निर्णय झाला नाही. शेतकऱ्यांसाठी कायदा, आरोग्य, शिक्षण, महिला शेतकऱ्यांसाठी निर्णय होणे गरजेचे आहे. देशातील ६ टक्के शेतकऱ्यांकडे वीजजोडणी आहे. १९९८ पूर्वी भारतातील शेतकऱ्यांची काहीही मागणी नव्हती; परंतु नंतरच्या काळात शेतीवर आधारित अभियांत्रिकीमुळे शेती आणि शेतकऱ्यांची व्याख्या बदलली. शेतकरी आत्महत्येचे आकडे खोटे आहेत. कारण एनसीआरबी ही संस्थाच सरकारने अवसायनात काढली. शासनाने अनेक विभाग विलीनीकरण, केंद्रीकरण आणि पुन्हा विलीनीकरण केल्यामुळे कुणाचाही कुणाला मेळ राहिलेला नाही. शेतकरी आत्महत्यांबाबत असलेला डेटा चुकीचा असल्याचा आरोप त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना केला. देशात ८ टक्के महिलांच्या नावे सातबारा आहे, हे प्रमाण वाढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

बोअरवेल्स, टँकरमध्ये मोठी उलाढाल हवामान खात्यांचा अंदाज चुकीचा ठरत असल्याचे सांगून पी. साईनाथ म्हणाले, बोअरवेल्स आणि टँकर पाणीपुरवठा हा कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा उद्योग झाला आहे. दिवसाकाठी ३ बोअरवेल्स खोदले जाण्याचे प्रमाण आहे. औरंगाबादमधील शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरविना दुसरा पर्याय नाही. दुष्काळाचे मूल्यमापन करण्याचे नियम क्लिष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी उपाययोजना, निर्णय घेण्यात १० ते २० दिवसांचा काळ जरी लोटला तरी शेतकऱ्यांना सावकारांच्या दाराशी जावे लागते. 

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेती