शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

माजलगावच्या शेतकऱ्यांचे पीपीई कीट घालून औरंगाबादेत आंदोलन; बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीची केली मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:12 IST

Farmers of Majalgaon agitate with PPE kit in Aurangabad : कोरोनाचे कारण सांगून समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँकेच्या मनमानीला कंटाळल्याने शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

ठळक मुद्देशेतकऱ्यांना पीक कर्ज कोणत्या कारणाने नाकारले याची माहिती देण्यात आली नाही.बँक अधिकारी कोरोनाचे कारण सांगून शेतकऱ्यांना भेटण्यास टाळाटाळ करतात

माजलगाव/ औरंगाबाद : माजलगाव येथील एसबीआयच्या शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी औरंगाबाद येथील क्षेत्रीय शाखेसमोर मंगळवारी दुपारी पीपीई कीट घालून अनोखे आंदोलन केले. कोरोनाचे कारण सांगून समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या एसबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळल्याने शेतकऱ्यांना पीपीई कीट घालून आंदोलन करावे लागले असे भारतीय जनता पार्टीचे माजलगाव तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी सांगितले. 

माजलगांव येथील एसबीआय शाखेत कर्ज माफी मिळालेल्या सुमारे बाराशे लाभार्थी शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारण्यात आले आहे. पीक कर्ज कोणत्या कारणाने नाकारले याची माहिती देण्यात आली नाही. हे विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना कोरोनाचे कारण सांगून भेटण्यास टाळाटाळ करण्यात येते. बँकेच्या गेटसमोर शेतकऱ्यांना ताटकळत उभे रहावे लागते. शेतकऱ्यांबरोबरच पेन्शन धारक वयोवृद्धांची हेळसांड बँकेतील अधिकारी, कर्मचारी करतात. गुराळासाठी कर्ज मंजूर झालेले परंतु बँकेची पॉलिसी न घेतल्यामुळे वर्षभरापासून कर्ज देण्यात आलेले नाही. कर्जाची कामे दलालांमार्फत केल्यास त्यांची फाईल त्वरित मान्य करण्यात येते. बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना यासंदर्भात भेट घेण्याचा प्रयत्न केल्यास कोरोनाचे कारण पुढे करून ते भेट घेण्यास चार- पाच महिन्यांपासून टाळाटाळ करत आहेत. या व्यथा मांडण्यासाठी शेतकऱ्यांनी औरंगाबादच्या सिडको येथील एसबीआयच्या क्षेत्रीय शाखेसमोर आंदोलन केले.  बँकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन मागण्यांच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

पीपीई कीट घालून शेतकरी आंदोलनात पीपीई कीट परिधान करून शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. तुम्ही आता कोरोनाची भीती बाळगू नका, आम्ही पीपीई किट घालून आलोय, आमच्या व्यथा ऐकून न्याय द्या, असे साकडे आंदोलनकर्त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे घातले. माजलगाव एसबीआय शाखेच्या कारभार, शाखाधिकारी आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, एसबीआयने माजलगांव तालुक्यात नवीन स्वतंत्र कृषी शाखा सुरू करावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. भाजपचे माजलगांव तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात बबन सोळुंके, ज्ञानेश्वर मेंढके, डॉ. भागवत सरवदे, बबनराव सिरसाट, कल्याणराव शेप, राधाकिशन सरवदे, नामदेव मुळे, अनंतराव जगताप, ईश्वरअप्पा खुर्पे, डॉ. अशोक तिडके, ज्ञानेश्वर सरवदे, अनंत शेंडगे, दत्तात्रय साडेगावकर, रमेशराव कुटे, सतीश राठोड यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, माजी महापौर बापू घडामोडे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSBIएसबीआयFarmerशेतकरीBeedबीडCrop Loanपीक कर्ज