शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी दुहेरी संकटात; पावसाची शक्यता अन ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 19:44 IST

Bad weather in Aurangabad : अगोदरच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मका, कपाशी, अद्रक, सोयाबीन, मूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

औरंगाबाद : दिवाळी होऊन पंधरा दिवस उलटले तरीही म्हणावी तशी थंडी पडली नाही. त्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली असून, काढणीला आलेला कापूस हातात येईल की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. दोन ते तीन दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

अतिवृष्टीने कापूस, तूर, बाजरी, मका आदी पिके हातची गेली. जी वाचली त्यातही उत्पादनात मोठी घट झाली. त्यातून लागवड खर्चही निघण्याची शक्यता नाही. अशात पुन्हा वातावरण बिघडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला असून थंडी नसल्याने रबीच्या पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मका, कपाशी, अद्रक, सोयाबीन, मूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातून वाचलेल्या कपाशी पिकाला आता कुठे कापूस फुटला आहे. त्याच्या वेचणीची लगबग सुरू असतानाच वातावरण बदलल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. गत चार-पाच दिवसांपासून किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा पंखे सुरू केले आहेत. अंशतः रोज ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणामयंदाच्या मौसमातील थंडी गेल्या काही दिवसांपासून जाणवायला लागली होती; परंतु तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीचा जोर ओसरला आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर, गहू, ज्वारी आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी