शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, उसाचे पाचट, गव्हाचे धसकट जाळू नका; शेतातच सडू द्या, जमिनीचा पोत सुधारतो

By बापू सोळुंके | Updated: December 22, 2023 12:10 IST

लवकरात लवकर जमिनीत कुजावे यासाठी त्यावर बाजारात मिळणाऱ्या औषधाची फवारणी करावी.

छत्रपती संभाजीनगर : उसाचे, गव्हाचे पीक घेतल्यानंतर पाचट-धसकट शेतकरी जाळून टाकतात. याचा जमिनीला आणि वातावरणाला तोटाच होतो. शेतीतज्ज्ञाच्या मते, गव्हाचे धसकट असो किंवा उसाचे पाचट जमिनीतच सडू दिले तर शेतजमिनीतीला सेंद्रिय कर्ब सुधारतो. परिणामी पिकाला पोषक तत्त्व मिळतात आणि उत्पादन वाढते.

उसाचे पाचट जाळू नका दरवर्षी शेतकरी उसाची तोडणी झाल्यानंतर उसाचे पाचट जाळून टाकतात. उसाचे पाचट जाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड मेहनत करावी लागते. मात्र, कृषीतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार उसाचे पाचट हे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी एक उत्तम असा सेंद्रिय पदार्थ आहे. हे पाचट शेतातच सडू द्यायला हवे.

मका, गव्हाच्या काड्या, धसकट जाळू नकागहू पिकाची कापणी झाल्यानंतर अथवा हार्वेस्टरने गव्हाची काढणी केल्यावर शेतात गव्हाच्या काड्या आणि धसकट उभे असते. खरीप हंगामासाठी शेत तयार करण्यासाठी शेतकरी सर्वप्रथम गव्हाच्या काड्या आणि धसकट जाळून टाकतात. मात्र, या काड्या आणि धसकट जाळून न टाकता. शेतकऱ्यांनी त्यावर नांगरणी करावी. जेणे करून हे धसकट जमिनीत सडून त्याचे खत होईल. हे खत पुढील पिकासाठी उत्तम असे टॉनिक असते.

प्रदूषण वाढले, जमिनीसाठीही धोकादायकदरवर्षी शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामपूर्वी शेतीतील गहू, मका, ज्वारी, बाजरीच्या पिकाचे धसकट, काडी, कचरा,उसाचे पाचट, कापसाच्या पराट्या जाळून टाकतात. यामुळे हवेतील प्रदूषणाचा स्तर वाढतो. वाढलेले प्रदूषण मानवासाठी आणि जमिनीसाठी धोकादायक ठरते, म्हणून शेतातील पिकांचा कचरा जाळू नका, असे आवाहन अभ्यासक करतात.

जमिनीत गाडणे लाभदायक गहू, मका, ज्वारी, बाजरी पिकाची काढणी झाल्यानंतर उरलेले धसकट, काडी, कचरा, उसाचे पाचट, कापसाच्या पराट्या न जाळता त्यावर रोटाव्हेटर फिरवून अथवा नांगर फिरवून जमिनीत गाडावे. लवकरात लवकर हे जमिनीत कुजावे यासाठी त्यावर बाजारात मिळणाऱ्या औषधाची फवारणी करावी. असे केल्यास जमिनीचा पोत सुधारतो.-सुरेश बेडवाल, विना मशागत शेतीचे पुरस्कर्ते.

जमिनीची सुपिकता वाढतेशेतातील कोणत्याही पिकाचा पाला, पाचोळा अथवा गव्हाच्या काड्या, उसाचे पाचट शेतात सडू दिल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. परिणामी जमिनीची सुपीकता चांगली होते आणि पुढील पिकाचे उत्पादन वाढते. उसाचे पाचट असो किंवा अन्य पिकाचा काडी, कचरा जाळल्यास हवेतील प्रदूषणच वाढते.-प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद