शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेल्या तारांच्या स्पर्शाने शेतकऱ्यांचा मृत्यू; पहिली जबाबदारी टाळणाऱ्या लाइनमनला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:37 IST

न्यायालयाकडून दाेन दिवस पोलिस कोठडी, आणखी कर्मचारी, अधिकारी तुरुंगात जाण्याची दाट शक्यता

छत्रपती संभाजीनगर : शेतात पेरणीसाठी गेलेल्या कचरू व किरण दहीहंडे या काका-पुतण्याचा वीज प्रवाहित तारांना स्पर्श होऊन शेतातच अंत झाला. सोमवारी सायंकाळी चिकलठाण्यातील घटनेनंतर सर्वच स्तरांतून बेजबाबदार महावितरणवर संतप्त टीका झाली. यात एमआयडीसी सिडको पोलिसांनी या कामाची पहिली जबाबदारी असलेल्या महावितरणचा लाइनमन प्रेमचंद लालचंद चव्हाण (रा. गारखेडा) याला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.

साेमवारी सायंकाळी ही घटना घडली. कुटुंबासह ग्रामस्थांनी तब्बल अडीच तास दोघांच्या मृतदेहासोबत रास्ता रोको करत महावितरणवर तीव्र रोष व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना पोलिसांनी धाव घेत महसूलच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली. मंगळवारी पहाटे महावितरणचे मुख्य अभियंत्यासह संबंधित लाइनमन, व्हॉट्सॲप (७०६६०४२२५०) क्रमांक असलेला कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुरुस्तीची जबाबदारी कोणाची?-एमआयडीसी सिडको पोलिसांनी रविवारी महावितरणच्या सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. चव्हाण त्या परिसरातील लाइनमन असल्याने सर्वप्रथम त्यास परिसरातील तारा दुरुस्तीस जबाबदार धरत अटक करण्यात आली.-चव्हाण व्यतिरिक्त तक्रारीची दखल घेणे, त्या सोडवणे, त्या न सोडविल्यास आणखी कोणावर काय जबाबदारी येते, याचा पोलिस तपास करीत आहेत. जबाबदारी निश्चित होताच त्यांच्यावरही अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

कुटुंबाला निश्चित न्याय मिळेलसदर घटनेप्रकरणी सबळ पुरावे गोळा केले जात आहेत. कोणावर काय जबाबदारी होती, याचे विवरण घेतले जात आहे. त्यानुसार सखोल तपास करून संबंधित प्रत्येकावर कारवाई होईल. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पोलिस निश्चित न्याय मिळवून देतील.-गजानन कल्याणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक.

टॅग्स :FarmerशेतकरीmahavitaranमहावितरणDeathमृत्यू