शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने शेतकरी कर्जबाजारी

By admin | Updated: May 13, 2014 01:07 IST

जळकोट : तालुक्यातील शेतकरी यंदा पूर्ण उन्हाळ्यात अवकाळी पावसासह, गारपीट, वादळी वारा यामुळे पूर्णत: हैराण झाला.

जळकोट : तालुक्यातील शेतकरी यंदा पूर्ण उन्हाळ्यात अवकाळी पावसासह, गारपीट, वादळी वारा यामुळे पूर्णत: हैराण झाला असून पुढील खरिप हंगामात जमिनीला अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याने शेतकरी कर्जाच्या छायेत अडकणार असल्याची भीती व्यक्त करत आहे. तालुक्यात उन्हाळा चालू झाल्यापासून वादळ वारा, अवकाळी पाऊस, गारपीटांनी हजेरी लावली. दिवसभर उन्हाचा तडाखा त्यानंतर सायंकाळी वादळी वारे, अवकाळी पाऊस यामुळे रब्बी पिके घेतलेल्या पिकांवर नांगर फिरुन शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावर शासनाने शेतकर्‍यांला मदतीपासून वंचित ठेवले. पूर्वीच कर्जबाजारी झालेला शेतकरी पुन्हा कर्जाचा डोंगर वाढून कर्जबाजारी झाला. येणार्‍या खरिप हंगामात शेतीची मशागत करून पेरणी करावे या हेतूने उभा टाकावा असे वाटू लागले होते. परंतु अवकाळी पाऊस आणि वादळी वारे शेतकर्‍यांचा पाठलाग काही सोडत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकरी या संकटाला आधीच घाबरुन गेला असता हवामान खातेही शेतकर्‍यांच्या छातीवर पुन्हा वजन टाकत यावर्षी पावसाळा हा कमी तथा मध्यम स्वरुपाचा असल्याचे सांगत आहे. त्यामुळे रब्बी पिके अवकाळी पावसाने नेली आता खरीप पिकांवर तर काही तरी करून डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल या आशेने बसलेल्या शेतकर्‍यांच्या जखमेवर आधीच शासनाने अनुदान न देता मीठ टाकले आहे. पुन्हा निसर्ग मीठ टाकेल का अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहे.जळकोट येथील पंचागकर्ते राजकुमार जोशी यांनी सांगितले की, यावर्षी शेतीचे उत्पन्नात घट होणार असून, पाणी यावर्षी कमी पडले, काही ठिकाणी तुरळक पाणीटंचाई भासणार आहे. यंदा जून अखेर चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होणार असून आॅगस्टमध्ये पाऊस समाधानकारक राहील. त्यानंतर काही ठिकाणी पावसाचा जोर राहील तर काही ठिकाणी कोरडे राहील असा अंदाज व्यक्त करत यावर्षी पावसाळा संमिश्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)