शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची चिंता वाढली; मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:29 IST

नोव्हेंबर २०१९ च्या पूर्वार्धापर्यंत पाऊस झाल्यामुळे रबी हंगामात पेरणीचे प्रमाण मोठे आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी पिकांसह आंब्याचे नुकसान झाले आहे. . एकूण बाधित पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश

औरंगाबाद : मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बीड, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुतांश महसूल मंडळांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला. नोव्हेंबर २०१९ च्या पूर्वार्धापर्यंत पाऊस झाल्यामुळे रबी हंगामात पेरणीचे प्रमाण मोठे आहे. खरिपातील नुकसानभरपाई रबीतून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असून, त्यावरही गारपीट आणि अवकाळीचे संकट आले आहे.  

अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी पिकांसह आंब्याचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सर्वाधिक फटका बीड तालुक्यातील राजुरी, पाली (२५ मि.मी.), लिंबा गणेश (८.७५ मि.मी.), पाटोदा तालुक्यातील पाटोदा (१३.७५ मि.मी.), दसखेड (८ मि.मी.), आष्टी तालुक्यातील थेरला (११ मि.मी.), दावलवडगाव (२४. ७६ मि.मी.) या मंडळांमधील गावांना फटका  बसला. 

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात पावसाची मोठी हजेरी होती. तालुक्यातील वाकोडी (१३.७५ मि.मी.), आखाडा (१९ मि.मी.), डोंगरकडा (१२.२५ मि.मी.), वारंगा (१३ मि.मी.) मंडळात जोरदार पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी (१४.७५ मि.मी.) व अंबड तालुक्यातील वडीगोद्री (९ मि.मी.) व सुखापुरी मंडळामध्ये ७.७५ मि.मी. पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पिंपरखेड (१३.५० मि.मी.), लोहा (८.७५ मि.मी.), किनवट (९.५० मि.मी.), हिमायतनगर तालुक्यातील जावळगाव (११.२५ मि.मी.) असा मोठा पाऊस झाला. लातूर जिल्ह्यालाही अवकाळीने फटका दिला. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा (१३ मि.मी.), उदगीरमधील नागलगाव (८.५० मि.मी.), मोहा (८ मि.मी.), रेणापूरमधील पेनगाव (१३.२५ मि.मी.), केरापूर (११.७५ मि.मी.) या मंडळांमध्ये मोठा पाऊस झाला. 

नुकसानीचे पंचनामे होणारराज्यासह औरंगाबाद विभागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण बाधित पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. शेती पिकांच्या नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज असून, कृषी विभाग व महसूल विभाग यांच्याकडून संयुक्त पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. आधीच दुष्काळी असलेल्या मराठवाड्याला काही वर्षांपासून गारपीट आणि अवकाळीचा फटका बसतो आहे. तीन महिन्यांपूर्वी अवकाळीने खरिपांची पिके हिरावून घेतली. आता रबी पिकांवर अवकाळीचे संकट आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र