कर्जाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 20:41 IST2019-07-03T20:39:27+5:302019-07-03T20:41:20+5:30

  अमळनेर : तालुक्यातील पिलोदे येथील लोटन रामराव पवार (वय ३५) व सुनीता लोटन पवार (३३) या शेतकरी दाम्पत्याने ...

 Farmer's Companion Suicide | कर्जाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

 


अमळनेर : तालुक्यातील पिलोदे येथील लोटन रामराव पवार (वय ३५) व सुनीता लोटन पवार (३३) या शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणामुळे बुधवारी दुपारी दोन वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर राष्ट्रीयकृत बँक, पीक विकास सोसायटी आणि खासगी सावकाराचे कर्ज होते. आठ बिघे जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा.
गेल्या दोन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे ते अधिक कर्जबाजारी झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. मोठा आठवीत तर लहान मुलगा चौथीत शिक्षण घेत आहे. तसेच वृद्ध आई व दोन विधवा बहिणींची जबाबदारीही त्यांच्यावर होती.
अमळनेर ग्रामीण रुग्णालयात डॉ.जी.एम.पाटील आणि डॉ.दिलीप व्यवहारे यांनी शवविच्छेदन केले.

 

Web Title:  Farmer's Companion Suicide