शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी आत्महत्या सुरूच; सोयगावात ३ दिवसात ३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 19:10 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणातून शेतकरी आत्महत्या

सोयगाव : सोयगावसह तालुक्यात दुष्काळाच्या दाहकतेने खरीप उत्पादक शेतकऱ्यांनी नापिकीची धास्ती घेतली आहे. यातच डोक्यावर कर्ज असल्याने आलेल्या नैराश्यातून तीन दिवसात तालुक्यातील ३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आले आहे. तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून शेतकरी आणि मजुरांनी हातांना काम नसल्याने स्थलांतर सुरु केले आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचारातून शेतकरी आत्महत्या या मुद्द्याच गायब झाल्याचे चित्र आहे.  

गुरुवारी पहाटे निंबायती येथील तरुण शेतकरी जगन सदू जाधव (३६  ) याने  पिकांची स्थिती पाहून आणि खासगी बँकांच्या वसुलीचा तगादा सहन न झाल्याने गळफास घेवून आत्महत्या केली. गेल्या चार दिवसापासून खासगी बँकेकडून त्याच्या मागे वसुलीचा तगादा लावल्याचे त्याच्या मुलीने सांगितले. गुरुवारी शेतात गेल्यावर कपाशी पिकांची गंभीर स्थिती पाहून बँकेकडून घेतलेले पिककर्ज व खासगी बँकाकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे याच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. 

दरम्यान, दोन दिवसापूर्वी सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणामुळे पळसखेड येथील वैजिनाथ थोरात(३१) आणि पहुरी येथील २१ वर्षीय भगवान जाधव या दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. ऐन निवडणुका आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणाच्या तोंडावर सोयगाव तालुक्यात दुष्काळाच्या धास्तीने तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळ्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

निवडणुकांच्या कामाने पंचनामे रखडलेमहिनाभरापासून तलाठी व महसूल विभाग निवडणुकांच्या कामांमध्ये गुंतला आहे. यामुळे तिन्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे अहवाल पाठविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद