शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून शेतकऱ्याची हत्या; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 12:22 IST

शेतीच्या जुन्या वादातून झाला घटना

हिंगोली : तालुक्यातील राहुली बु. येथे शेतीच्या वादातून एकाची संगनमत करून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शंकर लक्ष्मण डोरले (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी सात जणांविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मण डोरले यांचे शेतीच्या प्रकरणात काही शेजाऱ्यांसोबत जुने वाद आहेत. यावरून तीन महिन्यांपूर्वी त्यांचे भांडणही झाले होते. मंगळवारी (दि. २१ ) सायंकाळी लक्ष्मण त्यांच्या शेतात एकटे असताना शेजाऱ्यांनी शेतीच्या वादातून परत वाद सुरु केला. यातून सहा ते सात जणांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार करत गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी ए.जी. खान  यांनी घटनास्थळी भेट दिली.  याप्रकरणी लक्ष्मण गणपती डोरले यांच्या फिर्यादीवरून गणेश रामकिशन डोरले, अंबादास उर्फ  बाबुशा नामदेव घोंगडे, विठ्ठल नामदेव घोंगडे, ज्ञानेश्वर किशन बोरगड, मारुती विठ्ठल डोरले, रामकिशन पंडिता डोरले,  नामदेव तुकाराम घोंगडे ( सर्व राहणार राहुली बु. ) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि सुडके हे करीत आहेत. यातील चौघांना अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीPoliceपोलिसArrestअटक