शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई अटळ; जालना रोडवरील प्रसिद्ध वस्त्रदालन सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 19:33 IST

मनपा, जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाकडून संयुक्त कारवाई

औरंगाबाद : जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या पथकाने जालना रोडवरील काही बड्या आस्थापनांमध्ये गर्दीचे नियम पाळले जात आहेत की, नाही, हे आज दुपारी अचानक तपासले. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने आकाशवाणी समोरील राज क्लॉथ या दुकानाला पथकाने सील केले. तसेच शहरात जमावबंदीच्या आदेशाचेही सरार्स उल्लंघन होताना दिसत आहे.

जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या सहायक कामगार उपायुक्त वाय.एस.पडियाल, मनपाचे वॉर्ड अधिकारी संपत जरारे, जिन्सी पोलीस व इतर कर्मचाऱ्यांनी राज शोरूमला सील करण्याची कारवाई केली. गर्दीवर नियंत्रण यावे, कोरोना प्रतिबंधक लसीकरण शंभर टक्के व्हावे, यासाठी कारवाई करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसल्याचेही पडियाल यांनी सांगितले.

नियम मोडल्यास कठोर कारवाई होणारच शहर व जिल्ह्यातील सर्व आस्थापना, व्यावसायिक बाजारपेठांनी नियम पाळणे गरजेचे आहे. आलेल्या ग्राहकांचे लसीकरण झाले की नाही, याची खातरजमा प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे. जालना रोडवरील अनेक ठिकाणी अचानक तपासणी केल्यानंतर जेथे नियमांचे उल्लंघन झाले, ती दुकाने सील केली आहेत, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, जालना रोडवर वस्त्रदालन सील करण्याची कारवाई होताच, व्यापाऱ्यांनी तातडीने जिल्हाधिकारी चव्हाण यांची भेट घेऊन, सगळ्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस झाल्याचे सांगितले. ग्राहकांची तपासणी करण्यात येत असल्याचाही दावा केला. परंतु गर्दीचे नियम मोडले जात आहेत, त्यामुळे कारवाई करणारच, यावर जिल्हाधिकारी ठाम राहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद