छत्रपती संभाजीनगर: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या नावे चक्क बनावट पिवळे रेशनकार्ड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे या रेशनकार्डवर?मिळालेल्या माहितीनुसार, या पिवळ्या रंगाच्या रेशनकार्डवर उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (रा. आंबेडकरनगर, छत्रपती संभाजीनगर), पत्नी लता, मुलगा श्रीकांत, सून वृषाली आणि नातू रुद्रांश अशी नावे लिहून ते खरे भासवण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष म्हणजे, त्यावर अधिकृत वाटणारे शिक्के आणि स्वाक्षरीही करण्यात आली होती. हा प्रकार १२ मार्च रोजी सायंकाळी प्रशासनाच्या निदर्शनास आला.
ऑनलाइनच्या काळात 'हस्तलिखित' कार्डजिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तपासात असे समोर आले की, रेशनकार्ड क्रमांक वायपी ३४६२६१ (अर्ज क्र. ३४३६३८, कोड क्र. २५१६०५) असून ते पूर्णपणे हस्तलिखित आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून शासनाने केवळ ऑनलाइन शिधापत्रिका देणे सुरू केले आहे. त्यामुळे हे कार्ड पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. हा खोडसाळपणा आहे की यामागे काही मोठे रॅकेट, याचा तपास पोलीस निरीक्षक रोयलावार करत आहेत.
Web Summary : A fraudulent ration card, made in the name of Deputy CM Eknath Shinde and his family, surfaced in Chhatrapati Sambhajinagar. Authorities filed a police complaint against an unknown individual. The handwritten card had fake signatures and stamps, prompting a police investigation into the matter.
Web Summary : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उनके परिवार के नाम पर छत्रपति संभाजीनगर में एक फर्जी राशन कार्ड सामने आया। अधिकारियों ने एक अज्ञात व्यक्ति के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई। हस्तलिखित कार्ड पर नकली हस्ताक्षर और मुहरें थीं, जिसके बाद पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है।