शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

बनावट चालक मागतोय जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:33 IST

मॉर्निंग वॉक करणाºया चार जणांना चिरडणा-या जीप चालकाऐवजी दुस-याच व्यक्तीने न्यायालयात या केसमध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मॉर्निंग वॉक करणाºया चार जणांना चिरडणा-या जीप चालकाऐवजी दुस-याच व्यक्तीने न्यायालयात या केसमध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मात्र खरा वाहनचालक शोधून काढला असून, अपघातात किरकोळ मार लागलेल्या व्यक्तीच्या हातातून तो निसटून पळून गेला होता. शिवाय त्याचा मोबाइलही घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केला.सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मॉर्निंग वॉक करणाºया चौघांना भरधाव स्कॉर्पिओ जीपने चिरडल्याने ते जागीच ठार झाले. इतर दोन जण जखमी झाले. १६ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास केम्ब्रिज शाळेसमोरील चौकात हा अपघात झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून, पोलीस पसार झालेल्या जीपचालक-मालकाचा शोध घेत आहेत. या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या एकाने तीन दिवसांपूर्वी न्यायालयासमोर जबाब नोंदविला असून, त्यांच्या जबाबानुसार त्यांनी जीपमधून बाहेर पडणाºया जीपचालकास पकडले आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. यावेळी आरोपी जीपचालकाने त्याचे नाव त्यांना सांगितले आणि तो जर येथे थांबला तर लोक त्यास मारून टाकतील, अशी भीती व्यक्त करून तो त्यांच्या हाताला झटका देऊन पसार झाला. दरम्यान, मंगरूळ पीर (जि. वाशिम) येथील एका व्यक्तीने या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे सादर करण्याचे न्यायालयाने एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविले. पोलिसांना हा प्रकार समजताच धक्काच बसला. ज्याचा या घटनेशी संबंध नाही, अशी व्यक्ती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करीत असल्याने खºया आरोपी चालकास वाचविण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा पोलिसांना संशय आला. स्वत:ला आरोपी म्हणणाºया व्यक्तीच्या जामीन अर्जावर शनिवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.