शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दोन परीक्षांमध्ये अपयश अन् नंतर सलग ३ परीक्षांमध्ये यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 13:06 IST

जानेफळच्या शारदाची स्पर्धा परीक्षेत गगन भरारी

- विजय जाधव

शिऊर : केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये अपयश आल्यानंतर खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवून सलग ३ परीक्षांमध्ये यश संपादन करण्याची किमया वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथील शारदा कैलास त्रिभुवन या तरुणीने साधली आहे.

जानेफळ येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या शारदा कैलास त्रिभुवन या तरुणीचे शालेय शिक्षण गावातच झाले. ११ वी आणि १२ वीचे शिक्षण वैजापूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात झाले. यासाठी ती शेतवस्तीपासून दररोज ३ किमी पायी चालत वैजापूरसाठी एसटी बस पकडत असत. १२ वी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळाल्याने शारदाला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बीएस्सी ॲग्री प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला. तेथेच शारदाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परिक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चांगल्या गुणाने बीएस्सी ॲग्रीची पदवी मिळाल्यानंतर यूपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा दिली; परंतु त्यात यश मिळाले नाही. त्यानंतरही खचून न जाता बॅंकिंग व अन्य स्पर्धा परीक्षेची घरातूनच तयारी सुरू ठेवली. बॅंकिंगच्या परीक्षेत दोन वेळा मुलाखतीपर्यंत जाऊन यश मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा जोमाने तयारी चालू ठेवली. अशात घरातील मंडळींनी तिच्यासाठी स्थळ सुचवायला सुरुवात केली. घरच्यांच्या मनाप्रमाणे स्थळ आले आणि त्यांनी शारदाचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. शारदानेही त्यास होकार दिला.

हळदीला पहिलाच निकाल, आनंदात भर...शारदाचे लग्न जमल्यानंतर हळदीच्या दिवशी २२ जानेवारी २०२४ रोजी तिचा तलाठी भरती परीक्षेचा पहिला निकाल जाहीर झाला. त्यात ती जिल्ह्यातून मुलींमध्ये प्रथम आली. त्यामुळे घरच्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यानंतर १६ मार्च रोजी कृषी सहायकपदी तिची निवड झाल्याची बातमी आली. त्यानंतर १ एप्रिल रोजी बॅंकिंगच्या आयबीपीएस परीक्षेतची ती उत्तीर्ण झाल्याचा निकाल आला. त्यामुळे शारदाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कृषी क्षेत्र अधिकारीपदी निवड झाली. लागोपाठ तीन परीक्षांमध्ये शारदाने यश संपादन केल्याने कुटुंबीय, नातेवाईकांनी शारदाचे काैतुक केले. शिवाय गावातही शारदाच्या यशाचीच चर्चा सुरू झाली.

बालपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्नयाबाबत बोलताना शारदा म्हणाली, आईवडील, आजी-आजोबा यांच्या कष्टाची जाणीव होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवले. बालपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे अपयश आल्याने खचून न जाता परीक्षेची तयारी चालू ठेवली. त्यानंतर सलग तीन परीक्षांमध्ये यश मिळाले, याचे समाधान वाटते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMPSC examएमपीएससी परीक्षा