शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

फडणवीस तर दोन वर्षांपूर्वीच 'मियाँ देवेंद्र' झालेत; शिवसेनेचा 'जनाब' विधानावरून प्रतिहल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 18:18 IST

जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले.

औरंगाबाद : राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब ही उपाधी देऊन त्यांचा अवमान केला आहे. त्यांचे हे वक्तव्य अक्षम्य असून फडणवीस हे मियाँ देवेंद्र असल्याची टीका करीत शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्ला चढविला.

फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांचे इफ्तार पार्टीमधील फोटो दाखवित फडणवीस हे दोन वर्षांपूर्वीच मियाँ झाले आहेत, असा टोला लगावत एमआयएम आणि महाविकास आघाडी एकत्रित येण्याचे ‘पिल्लू’ भाजपनेच सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.खा. राऊत हे शिवसंपर्क अभियानासाठी मंगळवारी औरंगाबादेत असताना त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले उपस्थित होते.

जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले. मात्र फडणवीसांनी त्यांना जनाब असा उल्लेख करून अक्षम्य पाप केले आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही, मात्र फडणवीसांसह भाजपाने मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. असा आरोप खा.राऊत यांनी केला. निधी वाटपावरून शिवसेनेचे खा. गजानन कीर्तिकर, खा. श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. याबाबत खा. राऊतांनी सर्वांना समसमान निधी वाटप करण्यात आला आहे. आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले.

एमआयएमशी जवळीक नाहीमहाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत चलबिचल वाढावी, यासाठी एमआयएमसोबत आघाडी होईल, असे ‘पिल्लू’ भाजपने सोडण्याचे षडयंत्र रचले. मात्र शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. एमआयएमला शिवसेना कधीही जवळ करणार नाही, त्या पक्षाने भाजपचे बटीक रहावे. खा.इम्तियाज जलील नाटक करीत असल्याचा टोला खा.राऊत यांनी लगावला.

शेंडी, जाणव्यातील आमचे हिंदुत्व नाहीशिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी, जाणव्यातील नसून ते व्यापक आहे. असे स्पष्ट करीत खा. राऊत म्हणाले, मुस्लिमांच्या मतांसाठी भाजपने हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. यापुढे भाजपसोबत शिवसेनेची युती कधीही होणार नाही. यापुढे महाविकास आघाडीचे सरकार असेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना