शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपुरती कारखानदारी ! ; औरंगाबाद जिल्ह्यात केवळ चार साखर कारखाने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 14:08 IST

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांपैकी अवघ्या चार कारखान्यांत उसाचे गाळप सुरू असून, विशेष म्हणजे चारही कारखाने खाजगी आहेत. सहकारी तत्त्वावरील बंद कारखान्यांची कोट्यवधींची मालमत्ता व जमीन पडून आहे. आता हे कारखाने फक्त निवडणुकीपुरतेच शिल्लक असल्याची परिस्थिती आहे. 

ठळक मुद्दे यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांपैकी अवघ्या चार कारखान्यांत उसाचे गाळप सुरू विशेष म्हणजे चारही कारखाने खाजगी आहेत.

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांपैकी अवघ्या चार कारखान्यांत उसाचे गाळप सुरू असून, विशेष म्हणजे चारही कारखाने खाजगी आहेत. सहकारी तत्त्वावरील बंद कारखान्यांची कोट्यवधींची मालमत्ता व जमीन पडून आहे. आता हे कारखाने फक्त निवडणुकीपुरतेच शिल्लक असल्याची परिस्थिती आहे. 

जिल्ह्यात १० पैकी ६ सहकारी, तर ४ खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन एकूण १८७०० मेट्रिक टन गाळप क्षमता आहे. हे वाचून कोणालाही हा जिल्हा शेती व कारखानदारासाठी सधन असल्याचे जाणवेल; मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे. आजघडीला यातील अवघ्या ३ कारखान्यांत उसाचे गाळप केले जात आहे.  एका खाजगी व पाच सहकारी कारखान्यांतील मशिनरीला गंज लागला आहे. सुरू असलेल्यांमध्ये कन्नड येखील बारामती अ‍ॅग्रो, औरंगाबाद तालुक्यातील संभाजीराजे खाजगी कारखाना, पैठण येथील संत एकनाथ कारखाना व गंगापूर तालुक्यातील मुक्तेश्वर शुगर्स यांचा समावेश आहे.

या कारखान्यांनी आजपर्यंत ४ लाख २८ हजार ९१५ मे. टन उसाचे गाळप केले असून, त्यापासून ३ लाख ५२ हजार ६५० मे.टन साखर तयार झाली आहे. सरासरी ८.२२ टक्के उतारा मिळत आहे. यात संत एकनाथ कारखान्याने केलेले गाळप व साखर उत्पादन याच्या आकडेवारीचा समावेश नाही. या कारखान्याने आजपर्यंत ६६ हजार मे. टन साखर उत्पादन केले आहे; मात्र साखर आयुक्तालयात याची नोंदच नाही. कारण, या कारखान्याला ऊस गाळप करण्याची परवानगी साखर आयुक्तालयाने दिली नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उल्लेखनीय म्हणजे खुलताबाद परिसरातील घृष्णेश्वर साखर कारखाना उभारणीपासून आजपर्यंत बॉयलर पेटलेच नाही.

पैठण येथील शरद साखर कारखान्याचीही हीच परिस्थिती आहे; मात्र एकेकाळी साखर उत्पादनात गाजलेला गंगापूरचा  कारखाना असो वा सिल्लोडचा सिद्धेश्वर कारखाना किंवा फुलंब्रीचा देवगिरी कारखाना; मागील अनेक वर्षांपासून हे साखर कारखाने बंद आहेत. कर्जबाजारीपणा, राजकारण हीच या बंद कारखान्यांमागील ‘खेळी’ होय. जिल्ह्यातील २० हजार २६६ हेक्टरवर उसाची लागवड होत आहे. कारखाने बंद पडल्यामुळे लागवडीवरही परिणाम झाला आहे. 

साखर कारखाने बंद राहणे शेतकर्‍यांच्या हिताचे नाहीजिल्ह्यातील ६ कारखाने अनेक वर्षांपासून बंद आहेत. याचा अंतिम फटका ऊस उत्पादक, ऊसतोड कामगार, कारखान्यातील कामगारांना बसत आहे. यातून जिल्ह्यातील आर्थिक उलाढालीवर परिणाम होत आहे. यंदा उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. ऊस घेऊन जाण्यास कोणी तयार नाही. अशा वेळी बंद कारखाने सुरू झाल्यास त्याचा फायदा ऊस उत्पादकांना होईल. राज्य सरकारनेही याकडे सहकाराच्या भावनेने पाहिले पाहिजे. साखर कारखाने पुन्हा सुरू करून त्या तालुक्यातील अर्थचक्र गतिमान केले पाहिजे. यासाठी सरकारने साखर कारखान्यांना पाठबळ दिले पाहिजे व शेतकरी, ऊसतोड कामगारांना जगविले पाहिजे. - जगन्नाथ काळे, अध्यक्ष, देवगिरी सहकारी साखर कारखाना.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी