शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमदार सावे यांना फेसबूकवरून जिवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 22:46 IST

पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना एकाने फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली

औरंगाबाद  - पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना एकाने फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच सिटीचौक पोलिसांनी तडकाफडकी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देणा-या चार जणांना पोलिसांनी सहआरोपी केले.

 संभाजी भोसले (३८, रा. सिडको), असे धमकी देणा-या व्यक्तीचे नाव आहे. सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एस. सिनगारे म्हणाले की, आरोपी भोसले याने २३ जून रोजी सायंकाळी ६.३८ वाजता फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्याने ‘मी एका बीजेपी आमदाराचा खून करणार आहे. फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. जे फक्त ब्राह्मणांना प्रोटेक्शन देत आहे. थांबू शकत असाल तर मला थांबवा...’ असा मजकूर आहे. एवढेच नव्हे, तर भोसले याने अतुल सावे यांना अश्लील शिवीगाळ करणारी आणखी एक पोस्ट टाकली. या पोस्टला पाच जणांनी लाईक केले आणि चार जणांनी त्यावर कमेंट टाकली.  कमेंटस् टाकणाºयांशी संगनमत करून ही धमकी दिल्याचे आ. सावे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तडकाफ डकी कारवाई करून आरोपी भोसले याला अटक केली. अश्लील शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे आणि आय.टी. अ‍ॅक्टनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल के ल्याचे पोलीस निरीक्षक सिनगारे यांनी सांगितले. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचेही ते म्हणाले.