शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅडव्हान्स लिडरशिप’साठी ब्रिटीश कौन्सिलच्या नजरेत ‘गौरव’ देशात पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 19:24 IST

देशातील चार विद्यार्थ्यांना मंगळवारपासून केंब्रीज विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय ‘अ‍ॅडव्हान्स लिडरशिप’ कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देदेशभरातून अवघ्या चार विद्यार्थ्यांची ‘केंब्रीज’साठी निवडविविध राज्यांतून सहभागी ४५० विद्यार्थ्यांपैकी गौरव हा प्रथम ठरला 

- विजय सरवदे

औरंगाबाद : जगाला नवीन काही देण्याची जिद्द, संशोधकवृत्ती, संवाद कौशल्य व हाती घेतलेले काम तडीस नेण्याची चिकाटी असणाºया विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली येथे ब्रिटीश कौन्सिलने देशभरातील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. अतिशय चिकित्सक पद्धतीने घेतलेल्या सादरीकरण व संवाद कौशल्य चाचणीतून ब्रिटीश कौन्सिलच्या ‘ज्युरी’ने औरंगाबादच्या गौरव सोमवंशीला हेरले. विविध राज्यांतून सहभागी ४५० विद्यार्थ्यांपैकी गौरव हा प्रथम ठरला असून त्याच्यासह देशातील चार विद्यार्थ्यांना मंगळवारपासून केंब्रीज विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय ‘अ‍ॅडव्हान्स लिडरशिप’ कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. 

केंब्रीज विद्यापीठाने ‘अ‍ॅडव्हान्स लिडरशिप’ हा उपक्रम आयोजित केला आहे. यामध्ये जगभरातील नवसंशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने नावीण्यपूर्ण शोध लावला असेल, पण जगासमोर आणण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नसेल. अथवा केवळ अत्याधुनिक प्रयोगशाळेअभावी किंवा पैशाअभावी त्या संशोधनाचे पैलू तो विकसित करण्यास असमर्थ ठरला असेल, अशा नवसंशोधक विद्यार्थ्यांना सर्वार्थाने बळ देण्यासाठी केंब्रीज विद्यापीठात दहा दिवसांचा ‘अ‍ॅडव्हान्स लिडरशिप’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भारतासह १० ते १५ देशांतील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 

औरंगाबादच्या गौरवची या उपक्रमासाठी निवड झाली. गौरव हा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील तत्कालीन ‘कान, नाक, घसा’ तज्ज्ञ डॉ. ज्ञानदीप सोमवंशी यांचे चिरंजीव आहेत. गौरवचे शालेय व पदवीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादेतच पूर्ण झाले. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याने ‘संगणक अभियांत्रिकी’ची पदवी घेतल्यानंतर लखनौ येथे त्याने व्यवस्थापनशास्त्राचे पदव्युत्तर (आयआयएम) शिक्षण घेतले. 

यासंदर्भात गौरवने सांगितले की, केंब्रीज विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘अ‍ॅडव्हान्स लिडरशिप’साठी ब्रिटीश कौन्सिलने दिल्ली येथे मुलाखत व सादरीकरणाची स्पर्धा ठेवली होती. त्याची माहिती सोशल मिडियामधून मिळाली. त्यासाठी अर्ज केला. विविध राज्यांतून जवळपास ४५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वांना पाच- पाच मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. सर्वोत्कृष्ट सादरीकरण, उत्कृष्ट संवाद कौशल्य आणि नावीण्यपूर्ण संशोधनासाठी देशातून अवघ्या चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ‘ब्लॉकचैन टेक्नोलॉजी’मध्ये केलेले संशोधन हा माझा विषय होता, असे तो म्हणाला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र