शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बदली टाळण्यासाठी खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र,विस्तार अधिकाऱ्याला ५० हजार रुपये ‘कॉस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 12:51 IST

बदली रद्द करण्यासाठी त्यांनी मेडिकल बोर्डाकडून ४० टक्के अल्प दृष्टी असल्याचे दृष्टी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केले

ठळक मुद्देखोटे प्रमाणपत्र देणाऱ्या तिन्ही डॉक्टरांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश

औरंगाबाद : बदली टाळण्यासाठी खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करून शासनाची आणि न्यायालयाची फसवणूक केल्यामुळे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विवेक पेडगावकर यांनी ५० हजार रुपये शास्ती ( कॉस्ट) जमा करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र व्ही घुगे आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी दिला आहे. त्यांनी शास्तीची रक्कम जमा केली नाही, तर त्यांच्या तीन महिन्यांच्या पगारातून समान हप्त्यात ती वसूल करण्याचे आणि त्यांची खातेनिहाय (विभागीय) चौकशी करण्याचे आदेश खंडपीठाने हिंगोली जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्याचप्रमाणे दृष्टी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र देणारे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. मुदाम, आरोग्य अधिकारी डॉ. एन. एन. काळे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एन. मोरे यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही वैद्यकीय सेवा विभागाचे आयुक्त किंवा प्रधान सचिव यांनी करावी, असेही आदेश दिले आहेत.

काय होते प्रकरणपेडगावकर यांची बदली कुरुंदा येथून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे झाली होती. बदली रद्द करण्यासाठी त्यांनी मेडिकल बोर्डाकडून ४० टक्के अल्प दृष्टी असल्याचे दृष्टी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून, १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार बदलीतून सूट मिळावी अशी विनंती केली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शंका आल्यामुळे त्यांनी पेडगावकर यांना मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय बोर्डाकडे फेर तपासणीसाठी पाठविले. बोर्डाने पेडगावकर १०० टक्के फिट असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे त्यांची सेनगाव तालुक्यात बदली करण्यात आली.

तिसऱ्यांदा तपासणीया आदेशाविरुद्ध पेडगावकर यांनी खंडपीठातून स्थगिती मिळविली. जिल्हा परिषदेचे स्थायी अभियोक्ता संतोष पुलकुंडवार यांनी पेडगावकर यांना बदलीतून सूट देण्यास विरोध केला. पेडगावकर यांची औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात तिसऱ्यांदा तपासणी केली असता ते १०० टक्के फिट असल्याचे सिद्ध झाले. म्हणून न्यायालयाने पेडगावकर यांच्या बदलीला दिलेली स्थगिती उठविली. त्यामुळे पेडगावकर बदलीच्या ठिकाणी रुजू झाले. तेथे ३ वर्ष झाल्यामुळे त्यांना परत वसमत येथे बदलीने येण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी प्रलंबित याचिका परत घेण्यासाठी खंडपीठास विनंती केली. त्याला ॲड. संतोष पुलकुंडवार यांनी आक्षेप घेतला. न्यायालयाने त्यांचा आक्षेप मान्य करून पेडगावकर यांच्या अशा बेकायदेशीर कृत्यांकडे डोळेझाक करू शकत नसल्याचे मत व्यक्त करत वरीलप्रमाणे आदेश दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ