शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी जनशताब्दी एक्स्प्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 19:41 IST

Janshatabdi Express : या पूर्वी रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला, परंतु जालन्यातून औरंगाबादपर्यंत ही रेल्वे बहुतांशी रिकामीच धावते.

ठळक मुद्देप्रारंभी औरंगाबाद ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मंजूर करण्यात आली होती.

औरंगाबाद : सकाळच्या वेळेत मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची ठरणारी जनशताब्दी एक्स्प्रेस यापूर्वी जालन्यापर्यंत विस्तारित करण्यात आली. नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी उत्पन्न वाढीसाठी आता या रेल्वेचा विस्तार थेट हिंगोलीपर्यंत करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहेत. (Extension of Janshatabdi Express to Hingoli)

प्रारंभी औरंगाबाद ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मंजूर करण्यात आली होती. औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रवाशांना एका दिवसात मुंबईतील कामे आटोपून परत येण्याच्या दृष्टीने ही रेल्वे महत्त्वपूर्ण ठरते. सुरुवातीला ही रेल्वे औरंगाबाद ते सीएसएमटीपर्यंत धावत होती. मात्र, काही कालावधीनंतर ही रेल्वे दादरपर्यंतच धावू लागली. अशातच या रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला, परंतु जालन्यातून औरंगाबादपर्यंत ही रेल्वे बहुतांशी रिकामीच धावते. काही मोजक्या प्रवाशांसह या रेल्वेचा औरंगाबादपर्यंत प्रवास होतो. औरंगाबादहून या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. ही रेल्वे पुन्हा एकदा सीएसएमटीपर्यंत धावत आहे. पूर्वी सकाळी ६ वाजता सुटणारी ही गाडी आता सकाळी साडेनऊ वाजता सुटते. या सगळ्यात आता या गाडीचा विस्तार हिंगोलीपर्यंत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेल्वेकडून त्यास लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवीन रेल्वे देता येईलहिंगोलीहून मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू करता येऊ शकते. त्याचा रेल्वे प्रशासनाने विचार केला पाहिजे. जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार हिंगोलीपर्यंत केला, तर त्याला कोणाचा विरोध राहणार नाही, असे वाटते. कारण विस्तार करताना या रेल्वेला बोगी वाढविण्यात येतील.- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन