शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

औरंगाबादेत आगामी पाच वर्षांत विमानसेवेचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 8:04 PM

जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांमुळे जगभरातील पर्यटक औरंगाबादला येतात. शहरात औद्योगिकीकरणही वाढलेले आहे. त्यामुळे विमानसेवेचा विस्तार वाढण्यासाठी सर्व काही असूनही मोजकी विमानसेवा आहे.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांमुळे जगभरातील पर्यटक औरंगाबादला येतात. शहरात औद्योगिकीकरणही वाढलेले आहे. त्यामुळे विमानसेवेचा विस्तार वाढण्यासाठी सर्व काही असूनही मोजकी विमानसेवा आहे. त्यामुळे स्थानिक राजकारण आणि प्रशासनाने योग्य पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. तरीही पाच वर्षांत विमानसेवेचा आणखी विस्तार होईल, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे पश्चिम क्षेत्राचे कार्यकारी संचालक केशव शर्मा म्हणाले.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाचा (हायमास्ट) गुरुवारी (दि. २९) उद्घाटन सोहळा केशव शर्मा यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांची उपस्थिती होती. यावेळी १०० फूट उंच राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. डी. जी. साळवे यांनी औरंगाबाद विमानतळाच्या इतिहासाची माहिती देऊन आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा महिनाभरात सुरू होणार असल्याचे सांगितले.  विमानतळ विस्तारीकरणासाठी १८२ एकर जमीन अधिग्रहणाची कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ.  भापकर यांनी विमानतळाच्या विकासाबाबत शासनाकडून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. शरद येवले यांनी आभार मानले.

कंपन्यांकडे विमानांचा तुटवडासध्या विमान कंपन्यांकडे विमानांचा तुटवडा आहे. आगामी कालावधीत विमान कंपन्यांकडे ९०० विमाने येण्याची शक्यता आहे. यामुळे मराठवाड्यातून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्यास चालना मिळेल, असे केशव शर्मा म्हणाले. नवल किशोर राम यांनी जिल्हा प्रशासनातर्फे  विमानसेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सध्या विमान कंपन्यांकडे विमानांचा तुटवडा आहे. आगामी कालावधीत विमान कंपन्यांकडे ९०० विमाने येण्याची शक्यता आहे. यामुळे मराठवाड्यातून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्यास चालना मिळेल, असे केशव शर्मा म्हणाले. नवल किशोर राम यांनी जिल्हा प्रशासनातर्फे  विमानसेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.  

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAirportविमानतळtourismपर्यटनMIDCएमआयडीसीPoliticsराजकारण