शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाचा वॉर्ड कार्यालय स्थलांतरास ८२ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:46 IST

महापालिकेचे झोन ९ क्रांतीचौकातील पाण्याच्या टाकीजवळ आहे. हे कार्यालय जालना रोडवरील मुळे-तापडिया कॉम्प्लेक्समधील जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून मनपाच्या तिजोरीवर अक्षरश: दरोडे टाकण्याचे काम सुरू आहे. क्रांतीचौक पाण्याच्या टाकीजवळील वॉर्ड कार्यालय जालना रोडवरील मोंढानाका येथे स्थलांतरित करण्यासाठी अगोदर ४९ लाखांचा खर्च दाखविण्यात आला. हाच खर्च आता ८२ लाखांपर्यंत नेण्यात आला असून, शनिवारी स्थायी समितीनेही वाढीव प्रस्तावाला क्षणार्धात मंजुरी देऊन टाकली. विशेष बाब म्हणजे प्रशासनाकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

महापालिकेचे झोन ९ क्रांतीचौकातील पाण्याच्या टाकीजवळ आहे. हे कार्यालय जालना रोडवरील मुळे-तापडिया कॉम्प्लेक्समधील जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. या कॉम्प्लेक्समध्ये मनपाच्या मालकीची जागा असून, या जागेत वॉर्ड अभियंता आणि वॉर्ड अधिकारी, संपूर्ण कर्मचारी काम करतील. नवीन कार्यालयात सोयी- सुविधा देण्यासाठी मनपाने तब्बल ८२ लाख रुपयांच्या दोन निविदा मंजूर केल्या आहेत. ही दोन्ही कामे एस. एम. कन्स्ट्रक्शनला दिली गेली आहे. स्थायी समितीने शनिवारी कोणत्याही चर्चेविना दोन्ही निविदा मंजूर केल्या. मनपाने या कामासाठी आधी ४९ लाख ५६ हजार रुपयांच्या दोन निविदा काढल्या होत्या. त्यानंतर ठेकेदारास कायार्रंभ आदेशही दिले गेले. कामही सुरू केले. अंदाजपत्रकात सुधारणा करून ते ४९ लाखांहून चक्क ८२ लाखांचे करण्यात आले. पाऊण कोटी रुपयांच्या कामांची खरोखरच वॉर्ड कार्यालयात गरज आहे का? हे तपासण्याचे कामही कोणी केले नाही. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMONEYपैसाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादmondha nakaमोंढा नाका