शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

मराठवाड्यात खरीप हंगामाला दमदार पावसाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 19:30 IST

पुरेसा पाऊस न झाल्यास उत्पादनावर परिणाम होणार

ठळक मुद्देपावसाने २३ दिवसांत हुलकावणी दिल्यामुळे पेरण्यांनी अजून वेग घेतलेला नाही. गेल्या वर्षी ३० जूनपर्यंत २३ टक्के पाऊस झाला होता.

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाला दमदार पावसाची अपेक्षा आहे. ४५ लाख हेक्टरच्या आसपास खरीप हंगामात पेरणी होते. यावर्षी २८ जूनपर्यंत किती हेक्टरवर पेरण्या झाल्या याचा निश्चित आकडा समोर आलेला नाही. पावसाने २३ दिवसांत हुलकावणी दिल्यामुळे पेरण्यांनी अजून वेग घेतलेला नाही. 

गेल्या वर्षी ३० जूनपर्यंत २३ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी हे प्रमाण ८ टक्क्यांच्या आसपास आहे. १५ टक्के पावसाचा खंड पडल्यामुळे पेरण्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. १३६ मि.मी. पाऊस आजवर होणे अपेक्षित होते. ४४.६ मि.मी. इतका पाऊ स विभागात झाला आहे. ९२ मि.मी. पावसाचा खंड वार्षिक सरासरीच्या तुलनेत पडल्यामुळे खरीप हंगाम यंदाही धोक्याच्या वळणावर उभा आहे. २०१८ सालचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. जून आणि जुलै हे दोन्ही महिने गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पर्जन्यमान देऊ शकले नाही. त्याच्या परिणामी यावर्षी उन्हाळा भयावह राहिला. ३२०० टँकरने विभागात पाणीपुरवठा करावा लागला. यावर्षी वरुणराजा दुष्काळ आणि शेतीला दिलासा देईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. 

अभ्यासकांचे मत असेहवामानाचे अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. वाऱ्याची दिशा, वेग आणि वेळेत परिवर्तन झाले आहे. हा आभासी मान्सून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच पेरण्या कराव्यात. मान्सूनचे वारे पूर्वेकडे झुकले आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात पाऊस झाला. सध्या मान्सून कमजोर आहे. तो पुढे सरकत नाहीय. हवामान खात्याने मात्र मान्सून आल्याचे जाहीर करून टाकले आहे. 

विभागातील प्रकल्पांत ०.४० टक्के पाणीविभागातील एकूण ८७२ प्रकल्पांत ०.४० टक्के जलसाठा आहे. जूनअखेर आला असून, प्रकल्प परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट अजून कायम आहे. मोठ्या ११ प्रकल्पांत ०.२१ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ०.६० टक्के, ७४९ लघु प्रकल्पांत १.२० टक्के, गोदावरी आणि इतर बंधाऱ्यांत शून्य टक्के जलसाठा आहे. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र