शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या शहरातील रुंदीकरण कागदावरच; मनपा पदाधिकाऱ्यांची घोषणा हवेत विरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:18 IST

जुन्या शहरातील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी महापालिकेने घोषणा केली होती.

ठळक मुद्देमहापालिकेतील नगररचना विभागाने एका महिन्यात कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद : जुन्या शहरातील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी महापालिकेने घोषणा केली होती. निवडक रस्ते रुंद करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते. महापालिकेतील नगररचना विभागाने एका महिन्यात कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानंतर धार्मिक स्थळांना मोबदला देण्यासाठी खास शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.    

दिवाण देवडी, सिटीचौक ते गुलमंडी, औरंगपुरा ते मोतीकारंजा या भागातील रस्ते रुंद करण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. १५ दिवसांत रस्त्यांचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करावे, रुंदीकरणातील धार्मिक स्थळांना मोबदला देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नगररचना विभागाने काहीच कारवाई न केल्याने जुन्या शहरातील रस्त्यांचा प्रश्न जशास तसा आहे. २०११-१२ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जुन्या शहरातील ११ पेक्षा अधिक रस्ते रुंद केले होते. महापालिकेच्या तिजोरीत फक्त चार कोटी रुपये असतानाही त्यांनी व्यापक रस्ते रुंदीकरण मोहीम हाती घेतली होती.

ज्या मालमत्ताधारकांनी जागेवर मोबदला मागितला तरी त्याला देण्याची तयारी मनपाने दर्शविली होती. महापालिकेने नंतर सर्व मालमत्ताधारकांना टीडीआर, एफएसआय दिला होता. मागील ७ वर्षांमध्ये जुन्या शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळही प्रचंड वाढली आहे. त्यातच अरुंद रस्त्यावर अतिक्रमणेही तेवढीच वाढली आहे. जुन्या शहरातील काही रस्त्यांचा श्वास मोकळा केला असला तरी अद्याप काही रस्त्यांवर धार्मिक स्थळे जशास तशी उभी आहेत, तर काही रस्त्यांचे रुंदीकरणच झालेले नाही. दिवाण देवडी, सिटीचौक ते गुलमंडी, औरंगपुरा ते मोतीकारंजा या रस्त्यावर चार धार्मिक स्थळांचा अडथळा असल्याने मोबदला देण्याचा विषय प्रलंबित आहे. 

मालमत्ताधारकही तयारमहापालिकेने आर्थिक मोबदला न देता टीडीआर किंवा एफएसआय दिल्यास अनेक मालमत्ताधारक जागा देण्यास महापालिकेला तयार आहेत. मात्र, महापालिका प्रशासनच पुढाकार घेण्यास तयार नाही. टीडीआर घेणाऱ्या मालमत्ताधारकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदाही झालेला आहे. रस्ते रुंद झाल्यास मालमत्ताधारकांचाच अधिक फायदा होणार आहे.

परत पाठपुरावा करणारनगररचना विभागाला यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. जुन्या शहरातील सर्व रस्त्यांची यादी तयार करा, सर्वेक्षण करा, असे सांगितले आहे. काम अद्याप सुरू झाले नसेल, तर परत एकदा सूचना देण्यात येतील. मनपा आयुक्तही विकास कामात चांगला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्यांच्याशीही या विषयावर चर्चा करण्यात येईल.- नंदकुमार घोडेले, महापौर 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षाfundsनिधी