शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कुलगुरुपदाच्या उरकल्या मुलाखती

By admin | Updated: May 30, 2014 01:01 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपाल नियुक्त कुलगुरू शोध समितीने दोन दिवस आयोजित केलेल्या मुलाखतीचा कार्यक्रम एकाच दिवसात गुंडाळला.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपाल नियुक्त कुलगुरू शोध समितीने दोन दिवस आयोजित केलेल्या मुलाखतीचा कार्यक्रम एकाच दिवसात गुंडाळला. गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत २७ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीच्या कार्यक्रमाकडे मात्र, दोन जणांनी पाठ फिरविल्याचे सूत्राने सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू निवड प्रक्रिया राज्यपालांमार्फत राबविण्यात येते. याअंतर्गत जानेवारी महिन्यात पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सुमारे ६५ जणांनी कुलगुरू शोध समितीकडे अर्ज सादर केले होते. त्यापैकी २९ उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम २९ आणि ३० मे रोजी मुंबई विद्यापीठातील कलिना सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सात उमेदवारांचा समावेश आहे. कुलगुरू शोध समितीने मात्र, दोन दिवस चालणार्‍या मुलाखती एकाच दिवशी उरकल्या. प्रत्येक उमेदवारास केवळ २० मिनिटे एवढाच वेळ देण्यात आला होता. या काळात त्यांना विद्यापीठाबद्दलच्या त्यांच्या संकल्पना, विचार समितीसमोर सादर करावयाचे होते. त्याकरिता त्यांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनही सादर करण्याची मुभा होती. यानुसार प्रत्येक उमेदवाराने किमान ४५ मिनिटांपेक्षा अधिक कालावधी मिळेल, असे गृहीत धरले होते. प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी त्यांना केवळ २० मिनिटांतच आपणच कसे सर्वोत्तम उमेदवार आहोत हे पटवून द्यावे लागले. कुलगुरू शोध समितीतर्फे पाच जणांच्या नावांची शिफारस राज्यपालांकडे केली जाणार आहे. या पाच उमेदवारांना राजभवनातून बोलावणे येणार आहे. राज्यपाल हे स्वत: पाचही उमेदवारांशी थेट संवाद साधतील. त्यानंतर ते कुलगुरूची निवड जाहीर करतील. ही प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे सूत्राने सांगितले. कुलगुरूपदाच्या मुलाखतीचा केवळ सोपस्कार पूर्ण करण्यात आला आहे. कुलगुरूच्या निवडीकडे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागून आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रा. डॉ. देवानंद शिंदे, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. वि.ल. धारूरकर, डॉ. व्ही. बी. भिसे, डॉ. बी. एस. वाघमारे, डॉ. वाय. के. खिल्लारे, डॉ. एम. बी. मुळे या मातब्बर प्राध्यापकांनी कुलगुरू निवड समितीसमोर गुरुवारी मुलाखती दिल्या.