शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! औरंगाबादेत विहिरीत आढळला मृतावस्थेत बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 16:16 IST

बिबट्या शिकारीच्या शोधात आल्यानंतर चुकून विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे.

औरंगाबाद : शहरातील चिकलठाणा परिसरातील एका विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चौधरी कॉलनी परिसरातील महादेव मंदिराजवळील विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. 

चौधरी कॉलनी परिसरातील महादेव मंदिराजवळ एक विहिर आहे. या परिसराच्या बाजूला शेती असून विरळ वस्ती आहे. हा परिसरात भाविकांचे येणेजाणे असते. आज दुपारी काही भाविक महादेव मंदिरात दर्शनासाठी आले होते. भाविकांनी उत्सुकते पोटी जवळच्या विहिरीत पाहिले असता मृतावस्थेतील बिबट्या तरंगताना आढळून आला. त्यांनी लागलीच सर्पमित्र संघानंद शिंदे यांना संपर्क करून माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार हा बिबट्या दीड ते दोन वर्ष वयाचा असेल. तसेच एक दिवसांपूर्वी हा बिबट्या विहिरीत पडला असावा. 

चार वर्षांपूर्वीही शहरात आढळला होता बिबट्याबिबट्या शिकारीच्या शोधात आल्यानंतर चुकून विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. चौधरी कॉलनी परिसर शहराच्या जवळचा भाग असून येथे बिबट्याचा वावर होत असल्याचे या घटनेने पुढे आल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. चार वर्षांपूर्वी एक बिबट्या सिडको एन- १ परिसरातील नागरी वस्तीत शिरल्याने खळबळ उडाली होती. तेव्हा वन विभागाने बिबट्यास अथक प्रयत्नातून जेरबंद केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा शहरात बिबट्याचा वावर आढळून आला. 

टॅग्स :leopardबिबट्याAurangabadऔरंगाबादforestजंगल