शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! जादूटोण्याच्या संशयातून दिव्यांगाचा दगडाने ठेचून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 17:09 IST

आरोपीने दिव्यांगाला कुबडीने मारहाण करत जखमी करून नंतर दगडाने ठेचले

ठळक मुद्देही घटना औरंगाबाद - जालना या मुख्य रोडपासून अवघ्या काही फुटांवर घडली.

करमाड : जादूटोण्याच्या संशयातून एका दिव्यांग व्यक्तीला दगडाने ठेचून जीवे मारल्याची खळबळजनक घटना करमाड शिवारातील दर्गा परिसरात बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आली. ज्ञानेश्वर आसाराम गडकर ( ४८ रा. सावित्रीनगर, चिकलठाणा ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भाऊसाहेब सदू शेजवळ (रा.कुंभेफळ ता.औरंगाबाद ) या आरोपीस पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. 

ज्ञानेश्वर गडकर हे एका पायाने अधू होते. यामुळे ते कुबडीच्या सहाय्याने चालत असत. भाऊसाहेब शेजवळ याचा गडकर यांनी त्याच्यावर जादूटोणा केल्याचा संशय होता. यातून औरंगाबाद-जालना रोडपासून अवघ्या ५० फूट अंतरावर असलेल्या दर्ग्याजवळ गडकर आणि शेजवळ यांच्यात बुधवारी सकाळी वाद झाला. यानंतर शेजवळ याने गडकर यांच्यावर त्यांच्याच कुबडीने हल्ला केला. जबर हल्ल्यात कुबडी तुटल्यानंतर शेजवळ याने गडकर यांच्यावर दगडाने हल्ला केला. यात गडकर जबर जखमी झाले. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गडकर यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. 

आरोपीस घटनास्थळावरून घेतले ताब्यात ही घटना औरंगाबाद - जालना या मुख्य रोडपासून अवघ्या काही फुटांवर घडली. याची माहिती करमाड पोलिसांना मिळताच पेट्रोलिंगवर असलेले पोऊनी सुशांत सुतळे व चालक अजिनाथ उकर्डे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी भाऊसाहेब शेजवळ घटनास्थळीच होता. त्याने पोलिसांना पाहताच पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुतळे यांनी पाठलाग करून शेजवळला ताब्यात घेतले. घटनास्थळी करमाड पोलीस ठाण्याचे पोनी संतोष खेतमाळस, सापोनि प्रशांत पाटील यांनी भेट दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद