शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! बजाजनगरात अर्धनग्न अवस्थेत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 13:59 IST

crime in Aurangabad : बजाजनगरातील एसटी कॉलनीत आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळला मृतदेह

ठळक मुद्देखुन करुन मृतदेह कॉलनीत टाकून मारेकरी फरारवाळूज उद्योगनगरीत पंधरा दिवसात दुसरा खुन

वाळूज महानगर :  वाळूज उद्योगनगरीत खुनाचे सत्र सुरु असून आज बुधवार (दि.२) सकाळी ६ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील एस.टी.कॉलनीत एका अनोळखी महिलेचा अर्धनगन्न हात बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. मारहाण करुन खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह परिसरात टाकून मारेकरी फरार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, बजाजनगरातील एसटी कॉलनीत आज बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दत्तात्र्य पांढरे यांना अनिल वऱ्हाडे व अतुल राणे यांच्या घरासमोर एक अनोळखी महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली.  या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहा.पोनि.मदनसिंग घुनावत यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्या अनोळखी महिलेच्या अंगावर असलेली साडी बाजुला काढली असता तिचे दोन्ही हात ओढणीने बांधलेले तसेच चेहऱ्यावर मारहाणीच्या खुना दिसून आल्या. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे.दरम्यान, पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तसेच सीसीटीव्हीच्या मदतीने मारेकऱ्यांची अधिक माहिती घेतली जात आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणीसहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पोनि. प्रशांत पोतदार, गुन्हे शाखेचे निरीक्षक, अविनाश आघाव, उपनिरीक्षक विठ्ठल चास्कर, अमोल देशमुख आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांसोबत चर्चा केली. श्वान व फॉरेन्सिंगच्या लॅबच्या पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान टिपू हा घटनास्थळीच घुटमळल्याने मारेकरी वाहनातून पसार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या प्रसंगी श्वान पथकाचे एम.एम.तनपुरे, ए.व्ही.मोरे, ए.के.महेर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद