शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, शिंदे गटाच्या नेत्यांची सत्व परीक्षा; ३० उद्यानांचा कायापालट करण्यासाठी ७१ कोटी द्या!

By मुजीब देवणीकर | Updated: January 3, 2024 18:50 IST

नगरविकास विभागाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य योजनेंतर्गत निधी द्यावा, असा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका हद्दीत लहान- मोठे जवळपास १०० पेक्षा अधिक उद्याने आहेत. कर्मचारी, निधीअभावी या उद्यानांची दुरवस्था झाली आहे. त्यातील ३० उद्यानांचा विकास करण्यासाठी महापालिकेने ७१ कोटींचा प्रस्ताव तयार केला. नगरविकास विभागाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य योजनेंतर्गत निधी द्यावा, असा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. भाजपा, शिंदे गटाचे आमदार किती दिवसांत हा प्रस्ताव मंजूर करून आणतात, याकडे शहराचे लक्ष लागलेले राहील.

म्हणे शहराला निधी कमी पडू देणार नाहीसिडको एन-८ येथील नेहरू उद्यानात नौकाविहारचे लोकार्पण सोमवारी भाजपा, शिंदे गटाच्या नेत्यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांनी विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. अलीकडेच डीपी रस्त्यांच्या विकासासाठी मनपाने १ हजार कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केला. आता ७१ कोटींचा प्रस्ताव दिला आहे.

मनपाच्या प्रस्तावात या उद्यानांचा समावेशउद्यानाचे नाव ------------------अपेक्षित खर्च-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन उद्यान येथे तारांगण विकासित करणे- २ कोटी-पडेगाव परिसर मंजूर रेखांकनात नियोजित उद्याने- ५ कोटी-हर्सूल परिसर मंजूर रेखांकनात नियोजित उद्याने- ५ कोटी-मिटमिटा येथील गट नंबर १५५ व १५६ मंजूर रेखांकनात उद्याने- ५ कोटी-स्मृतिवन उद्यान, हर्सूल- २ कोटी-सावंगी तलाव उद्यान- १ कोटी-हिमायतबाग खुल्या जागेत उद्यान- २ कोटी-ऑडिटर सोसायटी उद्यान- ५० लाख-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान एन-११ सिडको-५० लाख-सिडको एन-१२ रेखांकनातील हरितपट्टा विकसित करणे- ५ कोटी-बटरफ्लाय उद्यान एन-११ सिडको-१ कोटी-बाबा गार्डन, एन-६ सिडको-१ कोटी-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल उद्यान सिडको एन-८ - ३ कोटी-सोरमबाई मलके उद्यान, नारेगाव- ५० लाख-केटली उद्यान, सिडको एन-३- १ कोटी-समई गार्डन सिडको एन-३- १ कोटी-दर्पण उद्यान सिडको एन-३- १ कोटी-डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान सिडको एन-१ -१ कोटी-शास्त्रीनगर उद्यान- १ कोटी-गारखेडा गट नंबर २० येथे उद्यान- १ कोटी-परिमल हाउसिंग सोसायटी उद्यान- ५० लाख-अलंकार हाउसिंग सोसायटी उद्यान- ५० लाख-नंदीग्राम हाउसिंग सोसायटी उद्यान- ५० लाख-सातारा परिसर मंजूर रेखांकनातील उद्याने- ५ कोटी-सहकारनगर उद्यान- १ कोटी-संजय हाउसिंग सोसायटी उद्यान- १ कोटी-कवितेची बाग उद्यान, ज्योतीनगर- १ कोटी-शिवाजीनगर परिसरातील उद्याने- २ कोटी-शहरातील पाच प्रमुख उद्याने साहसी खेळ उद्यान विकसित करणे- १० कोटी-शहरातील विविध ठिकाणी थीम पार्क उभारणी करणे- १० कोटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका