शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

‘जे रोज ऐक्याला विरोध करताहेत, त्यांच्या सभा उधळा, त्यांना वस्त्या-वस्त्यांमध्ये प्रवेशबंदी करा’: रामदास आठवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 16:08 IST

ऐक्य होत असेल तर मी मंत्रिपदालाही लाथ मारायला तयार असल्याची ग्वाही दिली

ठळक मुद्देहरिभाऊ बागडे, चंद्रकांत खैरे यांनी मेळाव्याकडे फिरविली पाठ आजचा आमचा मेळावा फक्त रिपाइं ‘ए’चा आहे असे स्पष्टीकरण

औरंगाबाद : ‘जे रोज ऐक्याला विरोध करीत आहेत, त्यांच्या सभा उधळा. त्यांना वस्त्या-वस्त्यांमध्ये प्रवेशबंदी करा’ असे खुले आवाहन आज येथे रिपाइं ‘ए’चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेला केले व ऐक्य होत असेल तर मी मंत्रिपदालाही लाथ मारायला तयार असल्याची ग्वाही दिली. 

जबिंदा लॉन्सवर आयोजित रिपाइं ‘ए’च्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी रिपाइं ‘ए’चे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम हे होते. उद्घाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे खूपच उशिरा आले. ते गोव्याहून या मेळाव्यासाठी उशिरा का होईना आले, असा खुलासा स्वत: आठवले यांनी केला. मात्र, प्रमुख पाहुण्यांपैकी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे पश्चिमचे आमदार संजय शिरसट यांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवली. ते आलेच नाहीत. आजच्या मेळाव्याचे आकर्षण ठरल्या रिपाइं ‘ए’ महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले व चिरंजीव जीत आठवले. सीमा आठवले यांनी तर रामदास आठवले यांच्याप्रमाणेच कवितांच्या ओळी सादर करीत व टाळ्या मिळवत आपले भाषण केले.

आव्हान पेलले गेले नाही... सध्या रिपाइं ‘ए’चे विभागवार मेळावे सुरू आहेत. मुंबई, सोलापूरनंतर आज औरंगाबाद विभागाचा मेळावा झाला. महामेळावा असे नाव दिले होते तरी तेवढ्या ताकदीचा हा मेळावा वाटला नाही. तेथे मांडून ठेवलेल्या संपूर्ण खुर्च्याही भरल्या नव्हत्या. विशेष म्हणजे स्वत: रामदास आठवले यांनी या मेळाव्याची उत्सुकता वाढवली होती. २ आॅक्टोबर रोजी ज्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व खा. असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली होती, ते मैदान आम्ही मराठवाडा विभागीय मेळाव्याच्या माध्यमातून भरून दाखवू, असे आव्हान आठवले यांनी दिले होते. २ आॅक्टोबर रोजी सभा २८ विविध जाती समूहांची आणि एमआयएमची होती. आजचा आमचा मेळावा फक्त रिपाइं ‘ए’चा आहे, असे स्पष्टीकरण द्यायला अनेक वक्ते विसरले नाहीत.

 राहुल गांधींना सेंच्युरी मारू देणार नाही... ‘२०१९ ची मॅच आम्हीच जिंकणार. राहुल गांधी यांना फार तर ६०-७० रन काढू देणार; पण सेंच्युरी मारू देणार नाही (हंशा व टाळ्या).

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपा