शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या प्रत्येक चौकावर भिकाऱ्यांचेच ‘राज्य’; नजर वळवली तर येतात अंगचटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 20:00 IST

आपल्या देशात भीक मागणे गुन्हा आहे. भीक मागणाऱ्यांवर पोलीस आणि समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार आहेत.

औरंगाबाद : शहरातील विविध चौक आणि वाहतूक सिग्नलवर गेल्या काही महिन्यांपासून भिकाऱ्यांचेच राज्य असल्याचे पाहायला मिळत आहे. अल्पवयीन मुले, मुली आणि महिलांकडून भीक मागून घेतली जात आहे.

लोकांनी भीक द्यावी यासाठी ते अपंग असल्याचे दाखविण्यासाठी काखेत कुबड्या घेऊन उभे राहतात. यासोबतच शहरातील बहुतेक सिग्नलवर तृतीयपंथीयांकडूनही वाहनचालकांकडे पैशाची मागणी केली जाते. पोलिसांनी त्यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. मुकुंदवाडी चौक, वसंतराव नाईक चौक, उच्च न्यायालय वाहतूक सिग्नल, गजानन महाराज मंदिर चौक, सेव्हन हिल, महावीर चौक, शहानूरमियाँ दर्गा, मिलकॉर्नर चौक, सिडको एन-१ चौक इ. ठिकाणी भीक मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अल्पवयीन मुले-मुली कारच्या काचा स्वच्छ करून कारमध्ये बसलेल्या व्यक्तीना पैसे मागतात. आवश्यकता नसतानाही कारची काच कपड्याने पुसणे आणि पैशांची मागणी करण्याचा प्रकार वाढला आहे. प्रमुख चाैकात आणि बीड बायपासवर तृतीयपंथीयांची वेशभूषा करून पैसे मागणाऱ्यांचाही त्रास वाढला आहे. प्रत्येक चौकात ही मंडळी टाळ्या वाजवून वाहनचालकांकडे पैशाची मागणी करतात. जे लोक पैसे देत नाहीत, त्यांना उलटसुलट बोलतात.

त्याने चक्क साडीच वर केलीसेव्हन हिल येथे तृतीयपंथीयांची वेशभूषा केेलेला एक जण प्रत्येक वाहनाजवळ जाऊन टाळी वाजवून पैसे घेतल्यानंतर तो एका दुचाकीस्वार दोन तरुणांजवळ गेला. पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने तुम्ही ओरिजनल नाहीत, असे म्हणून पैसे देण्यास नकार दिला. तृतीयपंथीय वेशधारीने थयथयाट करीत चक्क स्वत:च्या अंगावरील साडी कमरेपर्यंत वर केली. हा किळसवाणा प्रकार पाहून अशा लोकांवर पेालीस कारवाई का करीत नाहीत, असा सवाल वाहनचालक करीत होते.

भीक मागणे गुन्हाआपल्या देशात भीक मागणे गुन्हा आहे. भीक मागणाऱ्यांवर पोलीस आणि समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार आहेत. त्यांना भीक मागताना पकडल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले जाते. मानसिक संतुलन ठीक नसल्यास त्यांना मानसोपचार केंद्रात पाठविले जाते. शिवाय महिलांना अहमदनगर येथील भिक्षागृहात, तर पुरुष भिकाऱ्यांना पुण्यातील केंद्रात पाठविण्यात येते. तेथे त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशनही केले जाते.

दोन वर्षांपूर्वी झाली होती २६ भिकाऱ्यांवर कारवाईदोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांनी सामाजिक कार्यकर्ता वैभव घुले यांच्या मदतीने पोलिसांना सोबत घेऊन शहरातील २६ भिकाऱ्यांवर कारवाई केली होती. यानंतर मात्र कारवाई झाल्याचे दिसत नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी