शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

प्रत्येक शाळेत ‘ग्रीन स्काय क्लब’ करणार

By admin | Updated: January 17, 2016 00:05 IST

औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गचक्राविषयी जनजागृती निर्माण करणे. जीवसृष्टीचा ऱ्हास टाळण्यासाठी पक्ष्यांना वाचविणे गरजेचे

औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गचक्राविषयी जनजागृती निर्माण करणे. जीवसृष्टीचा ऱ्हास टाळण्यासाठी पक्ष्यांना वाचविणे गरजेचे असून, यासंदर्भात मोठ्या प्रमाणात पक्षीमित्र निर्माण होण्यासाठी येत्या वर्षात प्रत्येक शाळेत ‘ग्रीन स्काय क्लब’ स्थापन करण्याचा निर्णय घेऊन तिसऱ्या पक्षी महोत्सवाची सांगता झाली. पक्ष्यांच्या अनेक जाती काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. समाजात जागृती नसल्याने पक्ष्यांविषयी जास्त बोलले जात नाही. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना निसर्गचक्र कायम राखण्यात पक्ष्यांची किती महत्त्वपूर्ण भूमिका आहे याची जाणीव करून दिली, तर भविष्यात निश्चितच पक्षीमित्रांची संख्या वाढेल. पक्ष्यांना मारण्याऐवजी त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले जाईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पक्षी निरीक्षण, पक्षी ओळखा स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले. समारोपप्रसंगी सीआयआयचे अध्यक्ष एन. श्रीराम, विभास आमनकर, राजू कोसुंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. दिलीप यार्दी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग व पक्षी, प्राण्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आता पुढील वर्षात विधायक कार्य हाती घेण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक शाळेत ‘ग्रीन स्काय क्लब’ स्थापन करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पक्षी विश्वाची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय पक्षी विषयावरील चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धाही घेण्यात येणार आहे. याशिवाय सर्वसामान्यांमध्ये पक्षीप्रेम वाढण्यासाठी दर महिन्यात एका रविवारी वनजीवावरील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यावर चर्चा घडवून आणण्यात येईल, असेही यार्दी यांनी यावेळी जाहीर केले. सूत्रसंचालन किरण परदेशी यांनी केले. यावेळी शालेय विद्यार्थी व पक्षीप्रेमी हजर होते. पक्षी ओळखण्याची स्पर्धा गाजली असंख्य प्रकारचे पक्षी आहेत. प्रत्येक पक्ष्याचा रंग, शरीर, त्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात, याची शालेय विद्यार्थ्यांना कितपत माहिती आहे. हे जाणून घेण्यासाठी पक्षी महोत्सवात ‘पक्षी ओळखा’ स्पर्धा घेण्यात आली. या नावीन्यपूर्ण स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत नाथ व्हॅली हायस्कूल (प्रथम), मुकुल मंदिर प्रशाला (द्वितीय), जि.प. मुलींची शाळा, पैठण व स्वामी विवेकानंद अकॅडमी (तृतीय), तर एसबीओए व धर्मवीर संभाजी विद्यालयाने चौथ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत धोंड यांनी केले. पक्ष्यांसोबतच पक्षी निरीक्षकांचीही संख्या वाढलीदुष्काळामुळे जिल्ह्यातील लहान-मोठी तळी आटल्यामुळे सर्व पक्षी उपजीविकेसाठी जायकवाडी जलाशयात आले आहेत. शनिवारी सकाळी पक्षी महोत्सवानिमित्त जायकवाडी जलाशय परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आले. जशी पक्ष्यांची संख्या वाढली तशीच यंदा पक्षी निरीक्षकांची संख्याही वाढल्याचे दिसून आले. मागील वर्षी बोटावर मोजण्याइतकेच पक्षीमित्र पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी आले होते. आज सुमारे १५० जण पक्षी निरीक्षणासाठी येथे जमले होते. देशी व विदेशी पक्षी मनसोक्त विहार करीत होते. ते दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याची अनेकांची धडपड सुरू होती. बहुतांश पक्षीमित्रांनी दुर्बिणीतून पक्षी निरीक्षण केले. पक्षीमित्रांना दिलीप यार्दी, विभास अमोनकर, राजीव कुसुंबे, श्रवण परळीकर, बी.यू. पाठक आदींनी माहिती दिली.