शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर त्या मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:36 IST

पाच दिवसांनंतर कारवाई : बालकल्याण जिल्हा समितीची जरंडीला भेट

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील प्राथमिक शाळेत सतत ४ महिन्यांपासून २१ विद्यार्थिनींशी अश्लील संवाद साधून छळ करणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध अखेर पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.हरिदास काटोले (४२, रा. सोयगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, जरंडी येथील केंद्रीय प्राथमिक जि.प. शाळेचा मुख्याध्यापक हरिदास काटोले जवळपास चार महिन्यांपासून शाळेतील २१ विद्यार्थिनींशी अश्लील संवाद करून त्यांचा लैंगिक छळ करीत असल्याची तक्रार ५ फेब्रुवारी रोजी येथील मुलींनी पालकांकडे केली होती. यानंतर पालकांनी शाळेत धाव घेऊन जाब विचारला होता, तसेच येथे भेट देणारे गटविकास अधिकारी एम. सी. राठोड, गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे यांना घेराव घालून कारवाईची मागणी केली होती.दरम्यान, बिडीओ व गटशिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त चौकशी अहवालावरून बुधवारी या मुख्याध्यापकाला जि.प. सीईओ पवनीत कौर यांनी निलंबित केले होते. मात्र, याबाबत पोलीस ठाण्यात दाखल तक्रार मागे घेण्यात आली होती.मात्र, पालकांनी ही तक्रार माघार घेण्याची कारणे शोधण्यासाठी शनिवारी जिल्हा बालहक्क कल्याण समितीने जरंडी गाठून विद्यार्थिनींशी थेट चर्चा करून या प्रकरणात जिल्हा बालकल्याण समितीने गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई पार पडली, अशी माहिती जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड. ज्योती पत्की यांनी दिली.बालकल्याण समिती सदस्यांची जरंडी शाळेला भेट-दरम्यान, जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड. ज्योती पत्की, अ‍ॅड. अनिता शिवूरकर, प्रा.अश्विनी लखमले, पोलीस निरीक्षक शेख शकील आदींनी जरंडी शाळेला भेट देऊन विद्यार्थिनींशी संपर्क साधला. चौकशीअंती अखेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख शकील, उपनिरीक्षक गणेश जागडे, महिला पोलीस वैशाली सोनवणे, कविता मिस्तरी, सागर गायकवाड आदी करीत आहेत.

टॅग्स :SchoolशाळाCrime Newsगुन्हेगारी