शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंगावरून रेल्वे धावली तरी वृद्धाला खरचटलेही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 18:04 IST

वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न 

ठळक मुद्देपोलिसांनी वृद्धाला मुलाच्या स्वाधीन केले 

औरंगाबाद :  आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वेरुळावर झोपलेल्या वृद्धाच्या अंगावरून रेल्वे धावली, मात्र त्यांचे दैव बलवत्तर असल्याने त्यांना साधे खरचटलेदेखील नाही. रेल्वे मोटारमनच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी धावती गाडी थांबवून घटनेची माहिती पोलिसांना दिली. हा प्रकार बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील रेल्वेरुळावर घडला.

धोंडोपंत रामराव वडीकर (७२, रा. स्वप्नगरी, गारखेडा परिसर) असे त्यांचे नाव आहे. पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे म्हणाले की, धोंडोपंत हे जालना येथील सेवानिवृत्त अभियंता आहेत. स्वप्ननगरी येथील मुलाकडे ते राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हापासून बऱ्याचदा त्यांना आठवत नाही. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले आणि थेट मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळील रुळावर जाऊन झोपले. त्यावेळी जालन्याकडून आलेली एक गाडी तेथे थांबलेली होती. नंतर ही गाडी  पुढील प्रवासाला निघाली. गाडीचा वेग कमी असल्याने  रेल्वेरुळावर एक व्यक्ती झोपलेला असल्याचे रेल्वे मोटारमन यांना दिसले. त्यांनी लगेच गाडीला ब्रेक लावला. मात्र तोपर्यंत रेल्वेचे काही डब्बे धोंडोपंत यांच्या अंगावरून गेले होते.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  रेल्वेरुळावर झोपलेल्या धोंडोपंत यांना  प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी रेल्वेखालून बाहेर काढले. तेव्हा त्यांना साधे खरचटलेदेखील नसल्याचे दिसून आले. यानंतर त्यांना पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आत्महत्या करण्यासाठी रुळावर का झोपला आणि तुम्ही कोण आहात हे त्यांना सांगता येत नव्हते. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस कर्मचारी विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांनी त्यांचे समुपदेशन करून त्यांना बोलते केले. तेव्हा त्यांनी त्यांचे नाव आणि पत्ता सांगितला. यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुलाला बोलावून घेतले. किरकोळ कारणावरून नातेवाईकांसोबत झालेल्या कुरबुरीनंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले.

मुलाला बसला धक्का!७२ वर्षीय धोंडोपंत हे आत्महत्येसाठी रेल्वेरुळावर झोपल्याचे कळताच त्यांच्या मुलाला धक्काच बसला. त्यांनी वडिलांची काळजी घेण्याचे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची लेखी हमी पोलिसांना देऊन त्यांना घरी नेले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेPoliceपोलिस