शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा मंत्रिपद मिळाले नाही तरी खंत नसेल, मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व निर्णयांचे समर्थन: संदीपान भुमरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 19:14 IST

आमच्यात मंत्रीपदावरून काही वाद नाहीत, मला वगळले आणि संजय शिरसाट यांना मंत्री केले तरी माझी हरकत नसेल.

औरंगाबाद: मंत्रीमंडळावर अद्याप चर्चा झालेली नाही, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांमध्ये मंत्रीपदावरून काही वाद नाहीत, मला वगळले आणि संजय शिरसाट यांना मंत्री केले तरी माझी हरकत नसेल. मी मंत्री होतो तेव्हा शिरसाट माझ्यासोबत होते, ते मंत्री झाले तर मी सोबत असेल, अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली. बंडखोरीनंतर भुमरे आज सायंकाळी औरंगाबादला परतले. 

२० जून ला विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेत बंड करून वेगळी चूल मांडली. शिंदे यांच्या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे सहभागी झाले होते. गुवाहाटी, गोवा ते मुंबई असा प्रवास करून शिंदे यांनी भाजपाच्या सहाय्याने नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर सोमवारी विश्वासमत जिंकल्यानंतर बंडखोर आमदार आपल्या मतदार संघात परतत आहेत. आज सायंकाळी पैठणचे आमदार संदीपान भुमरे औरंगाबादला आले. विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पक्षाने आम्हाला मोठे केले, हे खरे. मात्र, मी देखील थेट आमदार झालो नाही. पक्ष वाढीसाठी मी ३५ वर्ष दिले आहेत. लाठ्याकाठ्या अंगावर झेलल्या. अनेक केसेस झाल्या. तरीही डगमगलो नाहीत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमुळे मला सर्वकाही मिळाले. माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक मंत्री झाला, असेही भुमरे यावेळी म्हणाले.

आमच्यात मंत्रीपदावरून कोणताही वाद नाही आम्ही बाहेर पडलो तेव्हा आमच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. पण आम्ही शांत राहिलो. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्यात मंत्रीपदावरून वाद होत असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, तसे काहीही नाही. मी मागच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होतो. तेव्हा आमदार संजय शिरसाट माझ्या सोबत होते. आता ते मंत्री झाले तर मी त्यांच्यासोबत असेल. मंत्रिपद मिळाले नाही तरी मला खंत नसेल, मुख्यमंत्री शिंदे जे निर्णय घेतील तो मान्य असेल, अशी स्पष्टोक्ती भुमरे यांनी दिली. 

धमक्यांना घाबरत नाही मी देखील बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. जे कोणी मला धमकी देत आहेत, त्यांनी माझ्याकडे येऊन दाखवावे. आज मी शहरात आलोय. उद्या शहरात असेल. आम्हाला कोणी धमक्या देऊ नये. मी धमक्यांना घाबरत नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :Sandeepan Bhoomraसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाट