शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

पाण्यासाठी चिमुकल्यांचीही भटकंती; जलवाहिनीच नसल्याने शंभूनगर वासीयांवर भीषण संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 17:31 IST

गुंठेवारीत कर लावून घेतला. परंतु सेवा-सुविधा देण्याचा विसर मनपाला पडला आहे

औरंगाबाद :  शंभूनगर, गारखेडा परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी लहान मुलांसह भटकंती करावी लागत आहे. पहाटे गादिया विहार परिसरातून पाणी वाहून आणावे लागते. 

विभागीय क्रीडा संकुलास लागून शंभूनगर ही वसाहत आहे. ही वसाहत बाराही महिने हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु उन्हाळ्यात बोअरही आटल्याने भीषण पाणी संकट ओढावले आहे. मात्र याकडे मनपाचे अधिकारी ढुंकूनही पाहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागातून मोठ्या व्यासाची जलवाहिनी गेली आहे. त्यातून नागरिकांना एक थेंबही पाणी देण्याचा अधिकार नसल्याचे अधिकारी सांगतात. गुंठेवारीत कर लावून घेतला. परंतु सेवा-सुविधा देण्याचा विसर मनपाला पडला आहे, अशी खंत नागरिक व्यक्त करतात. 

टँकरशिवाय आम्हाला गत्यंतर नसल्याचे शांतीलाल गायकवाड यांनी सांगितले. गुंठेवारी भागात पाणी देता येत नाही, असे सतत सांगून अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन आमची बोळवण करीत आहेत, असा आरोप प्रेमानंद वाघ यांनी केला. ‘कर घ्या पाणी द्या’, असे मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांना  बोलूनही पाणी प्रश्नाकडे सतत कानाडोळा केला जात आहे, असे उमर अहेमद म्हणाले. परिसरातील बोअरवेलने तळ गाठल्याने टँकर किंवा इतर वसाहतीत जाऊन पाणी आणावे लागते, असे रोहित प्रजापती, लड्डू दाभाडे म्हणाले. वयोवृद्धांसह मुलांना सकाळीच पाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे  घरातील कामे रखडतात, असे डॉ. रमेश शिंदे , जानेखा उस्मानखा पठाण, जावेद अहेमद यांनी सांगितले. 

शंभूनगरच्या लगत असलेल्या इमारत व कॉम्प्लेक्स भागातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा केला जातो. परंतु कर भरूनही येथील नागरिकांना मनपा मोफत टँकर पाठवीत नसल्याचे भीमराव साळवे, शेख छोटूमिया शेख कादर यांनी सांगितले. स्वखर्चाने लोकप्रतिनिधीने जलवाहिनी टाकून देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. परंतु त्याकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने खाजगी टँकरवरील पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे, असे यांनी सांगितले. 

नगरसेविका स्मिता घोगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, पाण्याची अवस्था गंभीर असून, जनतेला पाणी मिळावे म्हणून साडेअकरा लाखांची जलवाहिनीची फाईल आयुक्तांच्या टेबलवर पडून आहे. त्यावर सहीच झाली नाही. जनतेची पाण्यासाठीची भटकंती थांबविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. महापौर व आयुक्तांनी वॉर्डात येऊन जनतेचे प्रश्न जाणून घ्यावेत, अशी विनंतीदेखील मी केली आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका