शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

चिमूकलेही वासनेचे बळी, पीडितांमध्ये ११ टक्के अल्पवयीन मुली; परिचितांकडूनच सर्वाधिक घात 

By संतोष हिरेमठ | Updated: January 5, 2024 16:15 IST

पालकांनो काळजी घ्या, मुलांना ‘बॅड टच, गुड टच’ शिकवा

छत्रपती संभाजीनगर : महिलांबरोबर लहानगेही वासनेचे बळी ठरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. घाटी रुग्णालयात गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या पीडितांमध्ये तब्बल ११ टक्के अल्पवयीन मुली आहेत. अगदी ११ वर्षाच्या मुलीवरही अत्याचाराची घटना घडली. यात ओळखीच्या लोकांकडूनच सर्वाधिक घात झाला आहे. घाटीत लैंगिक अत्याचारग्रस्तांवर वैद्यकीय तपासणी, उपचारासह मानसिक आधारही देण्यात येत आहे.

ओळखीच्याच लोकांकडून शारीरिक, लैंगिक अत्याचाराला महिला सर्वाधिक बळी पडतात. अत्याचारानंतरही अनेक कारणांनी 'तिच्या' वेदना वाढतात. हीच परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाकडून ‘सुकून’ कक्ष सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यासह 'आय ॲम नॉट व्हिक्टीम' असा विश्वास देऊन पीडितांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. घटनेविषयी, आरोपी ओळखीचा आहे की, अनोळखी आदी माहिती घेतली जाते. त्यातूनच पोलिसांच्या तपासाला दिशाही मिळते आणि आरोपीला शिक्षा होण्यासही मदत होते.

घाटीत वर्षभरात किती अत्याचारग्रस्तांवर उपचार?घाटीत २०२३ या वर्षात तब्बल ७२४ अत्याचारग्रस्त महिलांवर उपचार करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाडा आणि लगतच्या भागातून पीडिता उपचारासाठी घाटीत दाखल होतात.

किती अल्पवयीन मुलींवर अत्याचार?गेल्या वर्षभरात घाटीत दाखल झालेल्या ७२४ पीडितांमध्ये तब्बल ८० अत्याचारग्रस्त या अल्पवयीन असल्याचे आकडेवारीवरून समोर आले. यात ११ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. लैंगिक अत्याचारांपासून १८ वर्षांखालील मुला-मुलींचे संरक्षण करण्याच्या हेतूने २०१२ मध्ये ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स’ म्हणजेच पोक्सो कायदा करण्यात आला. या सर्व अल्पवयीन पीडितांवरील अत्याचारप्रकरणी याच कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पालकांनी घ्यावी काळजीमुलांच्या सुरक्षेसाठी पालक नेहमीच दक्ष असतात. मुलांच्या संपर्कात कोणकोण असतात, याची पालकांनी माहिती घ्यावी. अनोळखी व्यक्तींपासून दूर राहण्यासह त्यांना ‘गुड टच बॅड टच’ची माहिती देणेही गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

सुकून कक्षात तपासणीपीडितांची विभागातील सुकून कक्षातच तपासणी केली जाते. पीडितांच्या तपासणीला प्राधान्यक्रम दिला जातो. पीडितांची वेळीच वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे. यातून पुरावे मिळून आरोपीला शिक्षा मिळण्यास मदत होते.- श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूती विभागप्रमुख, घाटी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळAurangabadऔरंगाबाद