शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षे झाले तरी अजिंठा लेणीकडे जाणारा रस्ता होईना! जागतिक पातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा मलीन

By विकास राऊत | Updated: May 29, 2025 07:31 IST

विकास राऊत छत्रपती संभाजीनगर : येथून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर बदनाम होण्याचा प्रसंग ...

विकास राऊत

छत्रपती संभाजीनगर : येथून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर बदनाम होण्याचा प्रसंग ओढवला आहे. या रस्त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे.

२०१५ पासून या रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्यामुळे पर्यटकांना चिखलयुक्त मार्गावरून वाहने न्यावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एनएच विभागाकडून 'तारीख पे तारीख' जाहीर करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेणीपर्यंतच्या रस्त्याने ४ नोव्हेंबर २०१५ रोजी चीनचे उपराष्ट्रपती 'ली यांचो' यांचा ताफा गेल्यावर परराष्ट्र खात्याने महाराष्ट्राच्या रस्त्यांप्रकरणी राज्य शासनाकडे तक्रार केली होती. 'महाराष्ट्राज् पी.डब्ल्यू.डी. शेम... शेम'... अशी टीका २०१५ मध्ये जागतिक पातळीवरून सुरू झाल्यानंतर रस्त्यावर ३० कोटी रुपयांत डागडुजी केली होती. ९५ किलोमीटर रस्त्यातील सुमारे २५ कि.मी.चा रस्ता क्लेशदायक आहे. जुलै २०२५ पर्यंत शिल्लक राहिलेले काम पूर्ण करू, असे सा.बां. विभागाचे म्हणणे आहे.

कंत्राटदार बदलूनही काम पूर्ण नाही

 २०१९ साली अवसायनात निघाल्याने आंध्र प्रदेशच्या ऋत्विक एजन्सी या कंत्राटदार कंपनीने बांधकाम विभागाच्या नॅशनल हायवे विभागाला हात दिल्यामुळे विभागाने तीन कंत्राटदार कामासाठी नेमले आहेत. १ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. रावसाहेब चव्हाण, कामटे व अन्य एक अशा तीन कंत्राटदारांकडे काम वर्ग केले. 

पहिल्या टप्प्यात ३०४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५०, तर तिसऱ्या टप्प्यात ३१६ कोटी अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद केली होती. ३०० वरून ७०० व पुढे १ हजार कोटीवर बजेट गेले. तो रस्ता काँक्रीटीकरणातून करण्याचे ठरले. ते काम झालेले नाही.

लेण्यांकडे जाणाऱ्या रस्त्याचा गळा घोटला.... 

अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या हर्मूल ते फर्दापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफच्या चौपदरीकरणाचे काम अजून पूर्ण होईना. रस्त्यालगतच्या कब्रस्तानाच्या स्थलांतराचा प्रश्न अडीच वर्षांपासून 'जैसे थे' असल्याने लेण्यांकडे जाणाऱ्या रस्त्याचाच गळा घोटला आहे.

कामावर किती खर्च ?

२०१५: ३० कोटींतून डागडुजी २०१८: १५ कोर्टीतून डागडुजी २०१९: १ हजार कोटींतून चौपदरीकरण २०२५ : अजूनही रस्त्याचे काम पूर्ण नाही

हर्सल भागातील कब्रस्तानाचे स्थलांतर करून रुंदीकरणासाठी जागा ताब्यात द्या, अशी राष्ट्रीय महामार्गाकडून कुणीही मागणी केली नाही. ज्यांना रस्त्याचे रुंदीकरण करायचे आहे, त्यांनाच याचे गांभीर्य नाही - व्यंकट राठोड, उपविभागीय अधिकारी 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार