शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बहीण-भावाची ताटातूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:51 IST

लहान बहिणीसह मामे-बहिणीला दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या एका भावावर शनिवारी काळाने झडप घातली. वाळूज महानगरातील गरवारे कंपनीसमोर भरधाव ट्रकच्या धडकेने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बहीण भावाची ताटातूट करणाºया या घटनेने औरंगाबादेतील क्रांतीनगरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात दोन बहिणी बालंबाल बचावल्या.

ठळक मुद्देकाळाची झडप : वाळूज महानगरात ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; दोन बहिणी बालंबाल बचावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : लहान बहिणीसह मामे-बहिणीला दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या एका भावावर शनिवारी काळाने झडप घातली. वाळूज महानगरातील गरवारे कंपनीसमोर भरधाव ट्रकच्या धडकेने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बहीण भावाची ताटातूट करणाºया या घटनेने औरंगाबादेतील क्रांतीनगरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात दोन बहिणी बालंबाल बचावल्या.

याविषयी अधिक माहिती अशी की, आशिष विजय गायकवाड (२३, रा. क्रांतीनगर, औरंगाबाद) हा महाविद्यालयीन तरुण आपली मामे-बहीण प्रीती विलास वंजारे (१८) हिला तिच्या घरी (बकवालनगर, ता. गंगापूर) येथे तिला सोडण्यासाठी निघाला होता.दरम्यान आशिष याची लहान बहीण श्रुती गायकवाड हिने त्यांच्यासोबत येण्याचा हट्ट धरल्यामुळे आशिष याने या दोन्ही बहिणीला सोबत घेऊन दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच-२० डीझेड ६७३६) वर क्रांतीनगर येथून बकवालनगरकडे जाण्यासाठी निघाले होते. शहरातून तिघे बहीण-भाऊ दुचाकीवर बकवालनगरकडे जात असताना सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गरवारे कंपनीजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाºया ट्रक (क्रमांक एमएच-१६ बी.३५४४) च्या चालकाने आशिष गायकवाड याच्या दुचाकीस जोराची धडक दिली.ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून आशिष हा ट्रकच्या चाकाखाली सापडला तर श्रुती व प्रीती या दोघी रस्त्यावर जाऊन पडल्या. या दुर्दैवी अपघातात ट्रकच्या चाकाखाली आशिष चिरडला गेल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. हा अपघात पाहतााच औरंगाबाद- नगररोडवरून ये-जा करणाºया वाहनधारकांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दुचाकीवरून खाली पडलेल्या दोघा बहिणींना सुरक्षितस्थळी हालवून या अपघाताची माहिती वाळूज पोलिसांना दिली.या अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार नारायण बुट्टे, पोहेकॉ. संजय शिंदे आदींनी अपघातस्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने चेंदामेंदा झालेल्या आशिषचा मृतदेह टू-मोबाईलने शासकीय रुग्णालयात घेऊन गेले.या अपघाताची माहिती मिळताच बकवालनगरातील प्रीती वंजारे हिचे आई-वडील, नातेवाईक व नागरिकांनी अपघातस्थळ गाठून किरकोळ जखमी झालेल्या प्रीती वंजारे व आशिषची बहीण श्रुती गायकवाड या दोघींना उपचारासाठी पंढरपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.या दोन्ही बहिणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून श्रुती हिच्या हाता-पायाला गंभीर जखमा झाल्या असून प्रीती हिच्या उजव्या हाताला जखम झाली असून, दोघींना मुका मार लागला आहे.भाऊराया न दिसल्याने बहिणी झाल्या अबोल...या अपघातात बालंबाल बचावलेल्या श्रुती व प्रीती या दोघींना नातेवाईकांनी पंढरपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. आशिष हा अपघातात जखमी असून, त्याच्यावर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगून नातेवाईक या दोघींना धीर देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र नातेवाईकांचे अश्रू पाहून काहीतरी अघटित घडले असल्याचे या दोघींना जाणवत आहे. अपघात झाल्याचा या दोघींना चांगलाच मानसिक धक्का बसला आहे. भाऊ दिसत नसल्याने त्या दोघीही अबोल झाल्याचे दिसले. नातेवाईकही हुंदके आवरत या दोघींचे सांत्वन करीत असल्याचे विदारक चित्र रुग्णालयात पाहावयास मिळाले.तिघे बहीण भाऊ एकाच महाविद्यालयाचे विद्यार्थीया अपघातात ठार झालेला आशिष गायकवाड हा शहरातील विवेकानंद महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत होता. याच महाविद्यालयात आशिष याची लहान बहीण श्रुती गायकवाड ही बारावीत तर मामे-बहीण प्रीती वंजारे ही बी.कॉम.चे शिक्षण घेत आहेत.या अपघातात आशिष गायकवाड याचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, श्रुती व प्रीती या दोघी किरकोळ जखमी झाल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू