छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील १२ टक्के पाणी एका महिन्यात आटले आहे. मागील महिन्यात विभागातील सर्व लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये ४८ टक्के जलसाठा होता. एका महिन्यात सर्व प्रकल्पांतील १२ टक्के पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. कडक ऊन, वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचेे घटलेल्या जलसाठ्याच्या टक्केवारीतून दिसते. यंदाच्या एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटा येत आहेत. महिनाअखेरपर्यंत पारा ४३ अंशांच्या पुढे जाईल, असे हवामान अभ्यासकांचे भाकीत आहे. चैत्रात ही अवस्था आहे, तर वैशाखात काय असेल, याचा अंदाज सध्याच्या तापमानातून येतो आहे.
मराठवाडा टँकरच्या फेऱ्यातमराठवाड्यातील मोठ्या, लघू आणि मध्यम प्रकल्पांतील जलसाठा उष्णतेमुळे घटतो आहे. विभागातील १४२ गावे टँकरच्या फेऱ्यात आली आहेत. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १०५ गावे, १५ वाड्यांत १५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालन्यातील ३० गावे, ८ वाड्यांमध्ये ५२ टँकर, नांदेडमधील ५ गावांत ५ टँकरने, लातूर व धाराशिवमध्ये प्रत्येकी एक गावात एक टँकर सुरू आहे. जायकवाडी धरण उशाला असतानाही विभागाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत. तापमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे. तापमान वाढत असल्यामुळे बाष्पीभवनाने पाणीसाठा कमी होत आहे.
विभागात २४ मार्च रोजी असलेला जलसाठामोठे प्रकल्प : ४४जलसाठा : ५५.२७ टक्केमागच्या वर्षीचा जलसाठा : २३.७४ टक्के
------------------------------------मध्यम प्रकल्प : ८१जलसाठा : ४३.२८ टक्केमागच्या वर्षीचा जलसाठा : २१.६५ टक्के------------------------------------
लघू प्रकल्प : ७९५जलसाठा : ३१.९८ टक्केमागच्या वर्षीचा जलसाठा : १८.५५ टक्के---------------------------------------------विभागात २२ एप्रिल रोजी असलेला जलसाठामोठे प्रकल्प : ४४जलसाठा : ४२.०८ टक्केमागच्या वर्षीचा जलसाठा : १५.२७ टक्के
---------------------------------मध्यम प्रकल्प : ८१जलसाठा : ३६.८१ टक्केमागच्या वर्षीचा जलसाठा : २०.०९ टक्के-----------------------------------लघू प्रकल्प : ७९५आजचा जलसाठा : २५.५४ टक्केमागच्या वर्षीचा जलसाठा : १७.१४ टक्के-----------------------------------