शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

'अजिंठा लेणी परिसरात पाली भाषेचे विद्यापीठ स्थापन करा'; बौद्ध धम्मपरिषदेत २० ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:52 IST

बिहार सरकारचा १९४९ चा कायदा रद्द करून बिहार येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावे, देशात सर्व स्तरांवरील अभ्यासक्रमात पाली भाषेचे शिक्षण अनिवार्य करावे.

अजिंठा : अजिंठा लेणी परिसरात पाली भाषेचे विद्यापीठ स्थापन करावे, फर्दापूर येथील धम्मायान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, वेरूळ-अजिंठा महोत्सव अजिंठा लेणीत घ्यावा, आदी विविध २० मागण्यांचे ठराव अजिंठा लेणीच्या पायथ्याशी बुधवारी (दि. ५) सकाळी ११ वाजता झालेल्या अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषदेत मंजूर करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्सिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या २० व्या बौद्ध धम्मपरिषदेत बुधवारी सकाळी दक्षिण कोरियातील राष्ट्रपती कार्यालयातील मुख्य सूचना मास्टर भदंत ली मायोनबे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ वाजता कोरिया येथील बौद्ध धम्माचे मुख्य मास्टर ली चांगबे यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन झाले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्सिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझमचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, सचिव भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, दक्षिण कोरीयन बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. लीचॅन रॅन, भदंत मास्टर लीम मुसोंग, भदंत डॉ. फ्रा अचान सिट्टीचोक सोमवरण, थायलंड येथील सिड्स फाउंडेशनचे अध्यक्ष सिरीयक फाट्राफसीट मैथाई, भदंत धम्मसेवक महाथेरो, भदंत शनानंद महाथेरो, एन आनंद महाथेरो, सिने अभिनेते गगन मलिक, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी मास्टर भदंतली मायोनबे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी धम्म स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. आ. अब्दुल सत्तार यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत करून मार्गदर्शन केले. यावेळी मांडलेले २० प्रमुख ठराव सर्वानुमते पारित केल्याची घोषणा मास्टर भदंतली मायोनबे यांनी केली.

धम्म परिषदेत मंजूर केलेले ठराव असेबिहार सरकारचा १९४९ चा कायदा रद्द करून बिहार येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावे, देशात सर्व स्तरांवरील अभ्यासक्रमात पाली भाषेचे शिक्षण अनिवार्य करावे. बुद्ध लेण्या, गुंफा, शिलालेख, स्तूप ही आपली राष्ट्रीय स्मारके आहेत. त्यांना पुरातत्त्व खात्याच्या नियमांप्रमाणे संरक्षण द्यावे, २०१५ च्या राष्ट्रीय जनगणनेत बौद्धांची नोंद अनुसूचित जातीत घेतल्याचे शासनाने सर्व संबंधितांना स्पष्ट आदेश द्यावेत. हिंदू विवाह व वारसा हक्क तसेच मुस्लीम पर्सनल लॉ याप्रमाणे बौद्धांसाठी स्वतंत्र बौद्ध विवाह वारसा हक्क कायदा निर्माण करावा. अजिंठा लेण्यांच्या 'टी' पॉइंटवर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळे उभारावेत, युपीएससीसाठी पूर्वप्रमाणित ऐच्छिक विषय म्हणून पालीचा समावेश करावा. मेहू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशी संलग्नित असलेल्या कँटोन्मेंट बोर्डाचे सुरू असलेले बांधकाम थांबवून ती जागा स्मारक समितीच्या ताब्यात द्यावी, विदेशातून आलेले धम्म ग्रंथ व बुद्धमूर्त्या दानांच्या स्वरूपात भारतात येतात. सरकारने त्यावर कोणतेही शुल्क आकारू नये, आदी ठराव यावेळी घेण्यात आले.फोटो कॅप्शन: अजिंठा लेणीच्या पायथ्याशी आयोजित अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित दक्षिण कोरियातील मास्टर भदंतली मायोनबे, गगन मलिक व अन्य मान्यवर.

English
हिंदी सारांश
Web Title : Pali language university in Ajanta; 20 resolutions passed at conference.

Web Summary : Buddhist conference in Ajanta demands Pali university, heritage status for Dhammayana site. Twenty resolutions passed, including protecting Buddhist sites and amending marriage laws. Key figures from Korea and Thailand attended.
टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर