शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दहा हजार अर्जांमध्ये त्रुटी; लाडक्या बहिणीला एकच संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 19:52 IST

अर्जासाठी महिलांची गर्दी : आतापर्यंत ५ लाख २६ हजार ५११ परिपूर्ण अर्ज

छत्रपती संभाजीनगर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ४१ हजार ५४२ महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी तालुकास्तरीय समित्यांनी अर्जांची छाननी करून ५ लाख २६ हजार ५११ परिपूर्ण अर्ज जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले असून १० हजार ३७ अर्जांमध्ये त्रुटी निघाल्या आहेत. दरम्यान, संबंधित महिलांना त्यासंदर्भात ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अर्जातील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी सध्या तरी एकच संधी आहे.

अर्जांची पडताळणी व योजनेच्या संनियंत्रणासाठी तालुकास्तरीय समित्या नेमल्या आहेत. तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अर्जाची पडताळणी करण्यात येते. या पडताळणीत काही जणींनी आधारकार्डची एकच बाजू अपलोड केली. हमीपत्रावर स्वाक्षरी नाही, अर्जावरील आणि आधार कार्डवरील नावात फरक आहे, आधार कार्डनुसार पत्ता नोंदविलेला नाही, बँक खाते आधार लिंक नाही, अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड यापैकी कोणते एक कागदपत्र जोडलेले नाही किंवा चुकीचे जोडले आहे, या त्रुटी अर्जांमध्ये आढळल्या आहेत.

जिल्ह्यातून दीड लाख अर्जजिल्ह्यात ५ लाख ४१ हजार ५४२ महिलांनी अर्ज केले असून यापैकी ५ लाख २६ हजार ५११ परिपूर्ण अर्ज प्राप्त झाले आहेत.

१० हजार अर्जांमध्ये त्रुटीआतापर्यंत १० हजार ३७ अर्जांमध्ये त्रुटी निघाल्या आहेत.

अर्जात दुरुस्तीसाठी एकच संधीसध्या तरी अर्जातील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी फक्त एकच संधी असून यासंदर्भात मंत्रालयीन स्तरावर संधी वाढवून देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पैसे देऊ नका, स्वत: भरा अर्जसध्या माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी अंगणवाडी, आपले सरकार सेवा केंद्र किंवा अन्य ठिकाणी गर्दी दिसत आहे. पण, घरबसल्या आपल्या मोबाइवरदेखील हा अर्ज भरता येतो.

कसा भराल ऑनलाइन अर्ज?‘नारीशक्ती दूत’ या ॲपच्या माध्यमातून अर्ज भरता येतो. त्यासाठी हे ॲप डाऊनलोड करावे. ते ओपन केल्यानंतर लॉगइन हे ऑप्शन दिसेल. त्यात आपला मोबाइल नंबर टाकावा. मग, मोबाइलवर आलेला ओटीपी टाकून लॉगइन करून घ्यावे. लॉगइन झाल्यानंतर आपली प्रोफाइल तयार करावी. त्यानंतर प्रत्यक्षात अर्ज भरण्याची प्रक्रिया करता येते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद