शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास

By admin | Updated: August 2, 2014 01:11 IST

इलियास बावाणी, माहूर शहर व परिसरातील जंगलातील अवैध गौण खनिज उत्खनन व वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने गावालगत असलेल्या टेकड्या बोडख्या झाल्या आहेत़

इलियास बावाणी, माहूरशहर व परिसरातील जंगलातील अवैध गौण खनिज उत्खनन व वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने गावालगत असलेल्या टेकड्या बोडख्या झाल्या आहेत़ अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाल्यास टेकड्यात पाणी मुरुन भूस्खलनासारखे प्रकार किंवा भूकंप झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे़मौल्यवान वनसंपदा याशिवाय गौण खनिज संरक्षण व अतिजळतन रोखण्यासाठी कुठलीच प्रभावी यंत्रणा माहूरच्या वनविभागाकडे उपलब्ध नाही़ त्यामुळे तालुक्यातील वन व गायरान जमिनीवर, टेकड्यावरील झाडे तोडून हजारो हेक्टरवर अतिक्रमण करण्यात आले़ वनजमीन व गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण अतिक्रमित जमिनीची सातबारावर नोंद करावी म्हणून हजारो अर्ज गेल्या वर्षभरात संबंधितांना देण्यात आले़ गेल्या वर्षभरात वनतस्करावर १२५ गुन्हे दाखल झाले आहेत़ २०१४ मध्ये आजपर्यंत ५५ गुन्हे दाखल करण्यात आले असून वनजमिनी गिळंकृत करणाऱ्यांवर राजकीय दबावापोटी एकही गुन्हा दाखल झाला नाही, हे विशेष़ माहूरगडावरील श्री रेणुका माता संस्थान हे अतिशय उंच टेकड्यावर आहे़ या टेकड्याला चोहुबाजूंनी असलेले जंगल आता विरळ झाले़ पायथ्याशी असलेले अतिक्रमण व रस्ताकामासाठी झालेले उत्खनन यामुळे भुसभुशीत पहाडाची नैसर्गिक पकड खिळखिळी झाल्याने रेणुकादेवी ते दत्तशिखर संस्थानकडे जाण्यासाठी रोपवे करण्यास शासनाने परवानगी नाकारली़ हीच अवस्था श्री दत्त शिखर संस्थान, अनुसया माता संस्थानचीही आहे़ देवदेवेश्वर संस्थाननी आपल्या मंदिराभोवती पटकोट बांधून घेतले आहे़ त्यापाठोपाठ श्री रेणुकादेवी संस्थान व श्री दत्तशिखर संस्थाननेही पटकोट बांधण्यास सुरुवात केली़ मंदिराचा खालचा भाग मात्र धोकादायक स्थितीत आहे़गडावर जाणाऱ्या रस्त्यावरील दक्षिणेकडील भाग माहूर शहराला जवळचा आहे़ या भागात नवी आबादी, गणेशनगर, लकडपुरा, देवदेवेश्वर मंदिर याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज मंडळ, दूरसंचार कार्यालय, जीवन प्राधिकरण कार्यालय व अनेक देवस्थाने आहेत़ तीर्थक्षेत्र प्राधिकरण विभागाने येथे रस्त्याचे काम केल्याने रस्ता व रामगड किल्ल्याच्या तटबंदीला लागून असलेला भाग उत्खनन केल्याने भुसभुशीत बनला आहे़ थोडासा पाऊस झाला की रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहे़ रस्त्यावर आलेले ढिगारे उचलून फेकण्याचे काम दररोज सुरू असते़ पावसात गडावर जाणाऱ्या वाहनावर दरडी कोसळून मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावरील भागात दगडांनी रचलेली पडळ रस्त्याच्या कामामुळे खिळखिळी झाली़ अतिवृष्टी अथवा भूकंप झाल्यास येथे १०० टक्के जीवितहानी होणार आहे़ या भागात रामगड किल्ल्याला लागून असलेल्या गायरान जागेत झाडे तोडून अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याने पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे़ शहराला लागून असलेल्या प्रत्येक टेकडीवर उत्खनन करून अतिक्रमण झाल्याने व रामगढ किल्ल्यासह संपूर्ण पहाड भुसभुशीत झाल्याने भविष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही़ ....असे होते भूस्खलन अत्याधिक पावसाने डोंगराला भेगा पडतात़ यात पावसाचे पाणी मुरल्याने घर्षण कमी होवून डोंगराच्या कडा ढासळतात़ तसेच मातीच्या कणांची पकड सैल होते़ वृक्षतोड, खोदकाम, सपाटीकरण या प्रकारामुळे नैसर्गिक रचना बदलली गेल्याने असे प्रकार घडतात़ मौल्यवान वनसंपदा याशिवाय गौण खनीज संरक्षण व अतिजळतन रोखण्यासाठी कुठलीच प्रभावी यंत्रणा माहूरच्या वनविभागाकडे उपलब्ध नाही़ त्यामुळे तालुक्यातील वन व गायरान जमिनीवर, टेकड्यावरील झाडे तोडून हजारो हेक्टरवर अतिक्रमण करण्यात आले़