शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

नोकरीच्या अमिषाने अभियंत्यानेच गंडविले २०० बेरोजगारांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 19:17 IST

२०० सुशिक्षित बेरोजगारांना गंडविणाऱ्या अभियंत्याला ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम सेलने अटक केली.

औरंगाबाद: स्कोडा, सिमेन्स, मायलन, एनआरबी अशा विविध नामांकित कंपन्यांत नोकरी देण्याचे अमिष दाखवून आणि बोगस नियुक्त्ीपत्रे पाठवून २०० सुशिक्षित बेरोजगारांना गंडविणाऱ्या अभियंत्याला ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम सेलने अटक केली. आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

निलेश अशोक वडमारे (वय २९,रा. बीड)असे आरोपीचे नाव आहे. तो आस्था कन्सटंन्सी नावाची फर्म चालवित होता.  पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपी हा अभियंता असून तो काही वर्ष पुण्यात नोकरीला होता. दिवसेंदिवस बरोजगार तरूणांची संख्या वाढतच असल्याने विविध नोकरी संदर्भ वेबसाईटवर रोज हजारो बेरोजगार नोंदणी करतात. याचाच गैरफायदा आरोपीने घेतला. जस्ट डायल डॉट कॉम आणि क्विकर या  वेबसाईटवर बेरोजगारांनी टाकलेल्या प्रोफाईल त्यांच्यांशी संपर्क साधत. त्याच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवानुसार तो उमेदवारांना विविध नामांकित कंपनीत नोकरीची संधी असून तेथील रिक्त पदे भरण्यासाठी कंपनीने त्यांच्या कन्सलटंन्सीला काम दिले असल्याची बतावणी करीत. तुम्हाला नोकरी हवी असेल तर नोंदणी शुल्क, मुलाखत फिसच्या नावाखाली तो पाच हजार ते साडेसात हजार रुपये घेत.

याशिवाय नोकरी लागल्यानंतर पहिल्या वेतनाच्या ५०टक्के रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा करण्याचे सांगत. त्याच्यावर विश्वास ठेवून सुमारे  उमेदवार त्याने दिलेल्या बँक खाते क्रमांकावरच्या आधारे  पाच हजार ते साडेसात हजार रुपये जमा करीत.  पैसे जमा झाल्यानंतर आरोपी त्यांच्या ई-मेलवर अथवा पोस्टाने त्याच्या पत्त्यावर संबंधित कंपनीचे बनावट नियुक्तीपत्रे पाठवून देत. अशाप्रकारे आरोपीने तब्बल २०० बेरोजगारांकडून साडेसात लाख रुपये उकळले. बोगस नियुक्तीपत्रे पाठविताना तो संबंधित कंपन्यांचे लोगो वापरत, यामुळे ते नकली आहे, याबाबतची शंका उमेदवारांना येत नव्हती. मात्र उमेदवार जेव्हा संबंधित कंपनीत नियुक्तीपत्र घेऊन जात तेव्हा त्याच्या पदरी निराशा पडत.

बऱ्याचदा संबंधित कंपनीत रिक्त पदे असेल आणि कंपनीला मनुष्यबळाची आवश्यकता असेल तेव्हा उमेदवारांच्या नशिबाने जर कंपनीने त्यांना नोकरी दिली तर आपल्या कन्सलटंन्सीमुळेच तुझी निवड झाली, असे तो सांगून उमेदवाराच्या पहिल्या वेतनातील अर्धी रक्कम घेत. आपल्या कंपनीचा लोगो परस्पर वापरून फसवणुक केली जात असल्याचे स्कोडा कंपनीला समजताच त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.सिंह  यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक मोहसीन सय्यद

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटकPoliceपोलिस