शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

गतविजेत्या पंजाबचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:41 IST

साईच्या पश्चिम विभागीय केंद्राच्या अ‍ॅस्ट्रोटर्फवर सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाने गतविजेत्या पंजाब संघाचे आव्हान संपुष्टात आणत दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. हरियाणाप्रमाणेच ओडिशा, मध्यप्रदेश संघांनी उपांत्य फेरी गाठली.

ठळक मुद्देराष्ट्रीय हॉकी स्पर्धा : हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश उपांत्य फेरीत

औरंगाबाद : साईच्या पश्चिम विभागीय केंद्राच्या अ‍ॅस्ट्रोटर्फवर सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाने गतविजेत्या पंजाब संघाचे आव्हान संपुष्टात आणत दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. हरियाणाप्रमाणेच ओडिशा, मध्यप्रदेश संघांनी उपांत्य फेरी गाठली.सोमवारी झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मध्यप्रदेशने चंदीगडचा ३-२ असा पराभव करीत पुढील फेरीतील प्रवेश निश्चित केला. हाशीमने चौथ्याच मिनिटाला गोल करीत चंदीगडला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत चंदीगड १-0 गोलने आघाडीवर होता. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला. मध्यांतरानंतर ३३ व्या मिनिटालाच आदर्श हर्दुआ याने गोल करीत मध्यप्रदेशला १-१ अशी बरोबरी साधून दिली. ४१ व्या मिनिटाला हरप्रीतसिंगने गोल करताना चंदीगडची आघाडी २-१ अशी वाढवली; परंतु त्यानंतर सौरभ पाशीन याने ५१ व्या व ५९ व्या मिनिटाला हैदर अली याने गोल करीत मध्यप्रदेशच्या रोमहर्षक विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे मध्यप्रदेशने २0१३ नंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले.ओडिशा हॉकी आणि गंगपूर ओडिशा यांच्यातील सामनाही चुरसपूर्ण झाला. हा सामना हॉकी ओडिशाने ३-२ असा जिंकला. मध्यंतरात दोन्ही संघ २-२ गोलने बरोबरीत होते. हॉकी ओडिशाकडून अजय एक्काने ९ व्या, प्रदीप लाकरा याने २0 व २८ व्या मिनिटाला गोल करीत संघाला विजय मिळवून दिला. गंगपूर ओडिशाकडून सुदीप चिमाकीने २५, पुरण केरकेट्टाने ४0 व्या मिनिटाला गोल केला. आज झालेल्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत गतविजेता पंजाब आणि उपविजेत्या हरियाणा यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. त्यात हरियाणा संघाने पंजाबवर २-0 असा सनसनाटी विजय मिळवताना सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित केला. सनी मलिक याने आठव्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत हरियाणा संघाला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत हीच आघाडी हरियाणाने कायम ठेवली. उत्तरार्धात ५३ व्या मिनिटाला रिमांशू याने गोल करीत हरियाणा संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. आजच्या अखेरच्या समान्यात उत्तर प्रदेशने साई संघावर मात करीत उपांत्य फेरी गाठली. आता मध्यप्रदेश वि. हॉकी ओडिशा यांच्यात पहिला आणि हॉकी हरियाणा व उत्तर प्रदेश यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.