शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जालना रोडवर ६० मीटरमधील अतिक्रमणधारकाकडून स्वत:हून सामान काढून घेणे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:20 IST

मनपाकडून मार्किंग आणि तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत, शनिवारी,रविवारी पाडापाडी

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवर ६० मीटरमधील अतिक्रमणधारक स्वत:हून आपल्या मालमत्ता काढून घेत आहेत. त्यामुळे महापालिका, पोलिस गुरुवारीही कारवाई करणार नाहीत. मालमत्ताधारकांना मार्किंग करून देणे, तोंडी सूचना देण्याचे काम मनपाकडून करण्यात येईल. मालमत्ताधारकांनी जेवढा वेळ मागितला होता, तेवढा देण्यात आला. शनिवारी आणि रविवारी मात्र कारवाई करण्यात येणार आहे.

जालना रोडवर मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत रस्ता ६० मीटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवार २० जून रोजी महापालिका, पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. २२९ अतिक्रमणे एका दिवसात पाडण्यात आली. अचानक केलेल्या कारवाईत अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मंगळवारी, बुधवारी अनेक मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. काही मालमत्ताधारकांनी एक ते दोन दिवसांचा वेळ मागितला. महापालिका प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना वेळही दिला.

अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले की, गुरुवारी, शुक्रवारी मनपा जालना रोडवर कोणतीही कारवाई करणार नाही. दिवसभर मालमत्ताधारकांना मार्किंग करून दिली जाईल. भोंगे लावून स्वत: मालमत्ता काढून घ्याव्यात, अशी सूचना केली जाणार आहे. शनिवार, रविवारी उर्वरित मालमत्ता काढून घेण्याचे काम मनपा करणार आहे.

स्वत: सामान काढून घेणे सुरूमुकुंदवाडी, चिकलठाणा, संजयनगर इ. भागांतील मालमत्ताधारकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. मंगळवारी रात्रीपासूनच अनेक व्यापाऱ्यांनी आपले सामान हलविण्यास सुरुवात केली. महागडे सामान कारवाईत खराब होईल, मोठे नुकसान होईल, या भीतीपोटी ३०० पेक्षा अधिक मालमत्ताधारकांनी सामान काढून घेणे सुरू केले. बुधवारी दिवसभर या भागात अतिक्रमणे काढून घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमण