शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाच्या ३५ कोटींच्या जागेवर पुन्हा अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 14:13 IST

२०११ मध्ये भूमाफियांनी प्लॉटिंग पाडून  ३५ कोटी रुपयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता.

औरंगाबाद : गारखेडा भागातील लक्ष्मीनगरात महापालिकेच्या खुल्या जागेवर २०११ मध्ये भूमाफियांनी प्लॉटिंग पाडून  ३५ कोटी रुपयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन उपमहापौर प्रशांत देसरडा यांनी हा डाव उधळून लावला होता. आता २०१८ मध्ये याच जागेवर टोलेजंग इमारत उभारण्याचे काम सुरू झाले असतानाही महापालिका निव्वळ बघ्याची भूमिका घेत आहे. या भागातील सुजाण नागरिकांनी कुंभकर्णी महापालिकेला जागे करण्याचे काम सोमवारी एका निवेदनाद्वारे केले.

शिवाजीनगर रोडवर पाण्याच्या टाकीमागील गट नं. ५३ मध्ये मनपाच्या मालकीची तब्बल २ एकर जागा आहे. १९९०-९१ मध्ये महापालिकेने जलकुंभासाठी देशमुख आणि आर. पी. नाथ यांच्याकडून दोन एकर जागा घेतली होती. या जागेवर महापालिकेने पाण्याची टाकीही बांधली आहे. २०११ मध्ये मनपाच्या जागेवर चक्क प्लॉटिंग पाडण्यात आली होती.  देसरडा यांनी  प्लॉटिंग पाडल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी भूमाफियांचा डाव उधळून लावला होता.

तब्बल सात वर्षांनंतर या जागेवर डोळा असलेल्या मंडळींनी पुन्हा कामाला सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून या जागेवर टोलेजंग इमारत उभारण्याचे कामही सुरू झाले आहे. अतिशय वेगाने हे काम सुरू आहे. या भागातील नागरिक विजय शिरसाट यांनी मनपाकडे तक्रार केली. १२ आॅक्टोबर रोजी मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाचे पथकही तेथे पोहोचले. क्षणार्धात एका फोनवरून पथक परतले. १५ आॅक्टोबर रोजी शिरसाठ यांनी थेट महापालिका आयुक्त, महापौर यांच्याकडे विविध पुराव्यंसह तक्रार दिली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादCorruptionभ्रष्टाचार